क्रिकेट प्रीमियर लीग 2017

मराठी भाषा दिवस-२०१६

नमस्कार , कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजराकेला जातो.या वर्षी महाराष्ट्र मंडळ, कुवैत च्या सर्व सभासदांनी दिनांक २६ फेब्रुवारी ला इंडिअन कम्युनिटीस्कूल, खैतान येथे एकत्र येउन मराठी राजभाषा दिवस साजरा केला. आपल्या मराठी भाषेचा प्रचार प्रसार करणे आणि सभासदांना आपले कलागुण प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा याकार्यक्रमामागचा हेतू होता. चहापानानंतर प्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी मराठी भाषेतविशेष योगदान केलेल्या काही दिग्गज व्यक्तिमत्वांच्या साहित्यप्रकाराचं सादरीकरण करण्याची संधीसभासदांना दिली होती. सभासदांनी सावरकर, शिरवाडकर, पाडगांवकर, शांताबाई शेळके तसंच गदिमांच्यासाहित्याच्या विविध छटा म्हणजेच साहित्य, गीतं, कविता सादर करून आपल्या प्रतिभेचं दर्शन घडवलं. मराठी भाषा दिवसाचं औचित्य साधून आपल्या सर्व बाल सभासदांमधेही मराठी भाषेची आवड आणिजाणीव जोपासण्याच्या उद्देशाने मंडळाने बालगोपाळांसाठी "उत्कृष्ट मराठी हस्ताक्षर " आणि "शुद्धलेखन"स्पर्धा आयोजित केली होती. पालकांनी आपल्या मुलांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उद्युक्त केल्याबद्दलत्यांचे तसेच स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार. या स्पर्धांमधे विजेते ठरलेल्या स्पर्धकांना परीक्षकांमार्फत बक्षिसंदेऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमादरम्यान मंडळाने नुकत्याच भरवलेल्या क्रिकेट टुर्नामेंटमधे विजेता व उपविजेता ठरलेल्या संघांनाचषक देऊन गौरवण्यात आलं. पानिपत , महानायक, संभाजी,झाडाझडती ,लस्ट फॉर लालबाग यासारख्या अनेक सुप्रसिद्ध कादंबऱ्यांचे लेखक श्री विश्वास पाटील या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 'मी आणि माझ्याकादंबऱ्या ' या त्यांच्या कार्यक्रमात श्री विश्वास पाटील यांनी , त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या मधील निवडकप्रसंग तसेच त्यांचे लेखन क्षेत्रातील विविध अनुभव श्रोत्यांसमोर मांडले. आपल्या खुमासदार शैलीनेऐतिहासिक प्रसंग त्यांनी रंगवून सांगितल्याने सर्व श्रोते त्यामध्ये हरवून गेले. मराठ्यांचा गौरवशालीइतिहास ऐकताना सर्व श्रोते भारावून गेले आणि काही प्रसंग सांगताना तर श्री. पाटील यांनी श्रोत्यांच्याअंगावर रोमांच उभे केले. कार्यक्रमाच्या अंती सर्व सभासदांनी त्यांच्या मनात असलेले इतिहास, लेखन,साहित्य तसेच मराठी भाषेचं भवितव्य या संदर्भातले अनेक प्रश्न श्री. विश्वास पाटील यांना विचारले आणित्यांची समर्पक उत्तरं देऊन त्यांनी श्रोत्यांचे शंका निरसन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. संकष्टी चतुर्थी असल्यामुळे मंडळाने कार्यक्रमानंतर सभासदांसाठी खास फराळाची सोय केली होती.साबुदाण्याची खिचडी, बदामाची बर्फी आणि ताक असा बेत होता. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला सभासदांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. कार्यक्रमाच्या आयोजनामधे काही त्रुटी राहिल्या असल्यास त्या अवश्य कार्यकारी समितीच्या कानावरघालाव्यात. त्या सुधारण्याचा प्रयत्न कार्यकारी समिती नक्कीच करेल. धन्यवाद !!

Marathi din

Newsletter

Contact us

You are here: Home News मराठी भाषा दिवस-२०१६