क्रिकेट प्रीमियर लीग 2017

'Just हलकं फुलकं '

काल महाराष्ट्र मंडळात 'Just हलकं फुलकं' या धम्माल नाटकाने दिवाळीच्या आगमनाची नांदी झाली.… आणि वातावरण  आनंदाने भरून गेले !!

सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे या अफलातून जोडीने धमाल उडवून दिली. दोघांचे कॉमेडी चे टायमिंग म्हणजे कमाल…  कसदार अभिनय,  विनोदाची उत्तम जाण आणि त्यातला सहजपणा यांमुळे प्रयोग खूप रंगत गेला. या दोघांबरोबरच या नाटकाचा तिसरा खांब म्हणजे अभिनेत्री अनिता दाते. एके काळी रसिका जोशींनी साकारलेल्या या भूमिकेचं आव्हान तिने तितक्याच ताकतीने पेललंय.  हे नाटक कुठेही थांबत नाही …. अतिशय वेगाने बदलत जाणारे सीन्स् त्याबरोबर बदलणारे वातावरण हेच त्याचे खरे वैशिठ्य !! सागर कारंडे आणि अनिता दाते दोघेही किती पटापट त्यांचे गेट अपस् आणि मूडस् बदलत होते आणि अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून लीलया वावरत होते … एक अचाट एनर्जीने भरलेला मनोरंजनाचा अॅक्शन पॅकड्  परफॉरमन्स !!! तीन तास सभागृहात अक्षरशः हास्याचे धबधबे कोसळत होते आणि लहान-थोर सर्वच प्रेक्षक लोटपोट हसत होते. अद्ययावत सभागृह, उत्तम नेपथ्य आणि त्याला पूरक ध्वनी आणि प्रकाश योजना यांमुळे नाटकाचा प्रयोग बहारदार झाला. त्याला साथ लाभली आपणा सर्वांच्या सहकार्याची आणि पाठिंब्याची !! 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अल मुल्ला ग्रुपचे श्री. व सौ. दावर तसेच श्री.व सौ जोशी व  श्री.व सौ. गयरोला यांनी आपुलकीने उपस्थित राहून मंडळाच्या सभासदांशी त्यांची बांधिलकी दृढ केली.

काही वेगवेगळे पण दर्जेदार कार्यक्रम आपल्यासाठी सादर करण्याच्या समितीचा प्रयत्न आपल्या पसंतीस उतरला याचा खूप आनंद होतोय… टेन्शन फ्री आणि आनंदाच्या वातावरणात सुरु झालेली ही दिवाळी आपणा सर्वांच्या आयुष्यात असेच समाधानाचे हास्य आणि सुख शांती घेऊन येवो ही कार्यकारीणी तर्फे शुभेच्छा !!

कार्यक्रमाच्या आयोजनात काही त्रुटी राहिल्या असल्यास क्षमस्व. 

कळावे, लोभ असावा ही विनंती !!

Newsletter

Contact us

You are here: Home News 'Just हलकं फुलकं '