दिवाळी सोहळा

कार म्युझियम

कोजागिरी पौर्णिमा दांडिया

गणेशोत्सव- २०१७

सह्याद्रीच्या सानिध्यात वाढताना आपोआप उंच आकाशाकडे पहायची सवय लागून जाते .... आदरणीय कलाम सर, तुम्ही सुद्धा तसेच ... प्रेरणास्थान ... उत्तुंग स्वप्न पाहायला शिकवणारे ... भावपूर्ण श्रद्धांजली ..

अब्दुल कलाम यांचा जन्म तामिळनाडूतील रामेश्वरम येथे १५ ऑगस्ट १९३१ रोजीएका नावाड्याच्या कुटुंबात झाला. घरच्या गरिबीमुळं सुरुवातीपासूनच कलामांनासंघर्ष करावा लागला. शिक्षण सुरू असतानाच घरखर्चाला हातभार म्हणून पेपरटाकण्याचं काम करावं लागलं. या संघर्षातून कलामांची जडणघडण होत गेली.बुद्धीनं तल्लख आणि कष्टाळू असलेल्या कलाम यांनी हार न मानता शैक्षणिकजीवनातले एकेक टप्पे यशस्वीरित्या पार केले. भौतिकशास्त्रातील पदवीशिक्षणानंतर संरक्षण संशोधन व विकास संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून प्रवेशमिळवला. आकाश कवेत घेण्याची इच्छा असलेल्या कलाम यांनी त्यानंतर कधीही मागेवळून पाहिले नाही.नाविन्याची आस आणि हाती घेतलेले काम पूर्णकरण्याच्या चिकाटीमुळं कलाम यांनी वैज्ञानिक जगतात स्वत:ची एक ओळख निर्माणकेली. भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात त्यांचे मोलाचे योगदानहोते. त्यांच्या या कामामुळं ते भारताचे 'मिसाइल मॅनम्हणून ओळखले जाऊलागले होते. कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नसतानाही २००२ साली कलामदेशाचे ११वे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. देशाच्या सर्वोच्च पदी बसलेलानावाड्याचा हा पोर एका अर्थानं देशाचा 'कॅप्टनझाला होता. देशाच्याकर्णधारपदाची ही जबाबदारीही कलाम यांनी समर्थपणं पेलली. राष्ट्रपती पदावरविराजमान होऊनही त्यांच्या वागण्यात कधीही बडेजाव नव्हता. अत्यंत साधेसरळआणि सर्वच स्तरांतील लोकांमध्ये सहज मिसळून जाणारे कलाम हे भारताचे सर्वातलोकप्रिय राष्ट्रपती म्हणून ओळखले जात होते.हाडाचा शिक्षकप्रेरक कृतीशील


डॉ. कलाम हे हाडाचे शिक्षक होते. शास्त्रज्ञराष्ट्रपती असतानाहीशिक्षकाची भूमिका त्यांनी कधीही सोडली नाही. राष्ट्रपती असताना देशभरातीलशाळाविद्यापीठे व शिक्षणसंस्थांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकरण्यासाठी ते सतत भ्रमंती करत राहायचे. कलाम यांना ऐकण्यासाठीशाळा-कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांची अक्षरश: झुंबड उडायची. कलाम काय बोलतातयाकडं विद्यार्थीच नव्हेतर देशभरातील'जिज्ञासूजगतकायम कान लावूनअसायचे. त्यांच्यातील अभ्यासू शिक्षकाला व योग्य मार्गदर्शकाला मिळणारी हीएक पोचपावतीच होती. राष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यानंतरही कलाम हेदेशातील नामांकित विद्यापीठांत मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तेकेवळ व्याख्यानं देऊन थांबणाऱ्यांपैकी नव्हते. तर कृतीतून प्रेरणा देणारेकृतीशील होते. याच जाणिवेतून २०१२ साली त्यांनी देशातील तरुण वर्गासाठी 'व्हॉट कॅन आय गिव्हही चळवळ सुरू केली होती. भ्रष्टाचार निर्मूलन हा याचळवळीचा गाभा होता. या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी तरुणांनाभ्रष्टाचारविरोधात लढण्याची प्रेरणा दिली होती. असा हा प्रेमळ आणि प्रेरकशिक्षक कायमचा हरपल्यानं देशातील विद्यार्थीजगत शोकसागरात बुडाले आहे.

Newsletter

Contact us

You are here: Home News सह्याद्रीच्या सानिध्यात वाढताना आपोआप उंच आकाशाकडे पहायची सवय लागून जाते .... आदरणीय कलाम सर, तुम्ही सुद्धा तसेच ... प्रेरणास्थान ... उत्तुंग स्वप्न पाहायला शिकवणारे ... भावपूर्ण श्रद्धांजली ..