दिवाळी सोहळा

कार म्युझियम

कोजागिरी पौर्णिमा दांडिया

गणेशोत्सव- २०१७

MMK Picnic 2015 Report

नमस्कार,

 
आपल्या महाराष्ट्र मंडळाची वार्षिक सहल शुक्रवार, २० मार्च २०१५ रोजी कब्द येथील फार्म हाउस मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. हि सहल म्हणजे सर्वांसाठीच रोजच्या त्याच त्या वेळापत्रकातून थोड्या बदलाचा आणि आपल्या मित्रपरिवारा सोबत हसतखेळत, मजेत घालवण्याचा दिवस. मंडळातर्फे सालमिया आणि अबू हलीफा या दोन्ही ठिकाणांहून बसेस ची व्यवस्था करण्यात आली होती. तर अनेक सभासद स्वतः च्या गाडीने सहलीच्या ठिकाणी पोहोचले. सर्वच लहान - थोर मंडळी अत्यंत उत्साहात दिसत होती. 
 
फार्म हाउस मध्ये पोहोचताच सभासदांनी गरम गरम नाष्ट्याचा आनंद घेतला. आणि मग सुरु झाला एक 'Action Packed' दिवस !
 
सर्वात सुरुवातीला सर्व लहान थोर मंडळीनी एकत्र खेळावेत असे अनेक मनोरंजक ग्रुप गेम्स खेळले गेले. सर्वांनी त्यात उत्साहाने भाग घेतला. त्यानंतर लहान मुलांसाठी अनेक नाविण्यापूर्ण खेळ आयोजित करण्यात आले, त्यातही मुलांनी हिरीरीने भाग घेतला. खो-खो, डॉज-बॉल , क्रिकेट अशा मैदानी  खेळांचा मोठ्यांनीही समरसून आस्वाद घेतला. मुलांसाठी पोहण्याचा तलाव खुला करण्यात आला…  आणि बच्चा पार्टी खुश !! पाण्यात यथेच्छ मजा मस्ती केल्यानंतर त्यांचे चेहरे आनंदाने फुलून आले होते. 
 
अल मुल्ला ग्रुप चे श्री जॉन सायमन यांनीही काही वेळ कार्यक्रमाला हजेरी लावून सभासदांशी संवाद साधला. 
 
पुरुषांसाठी यानंतर पोळी लाटण्याची एक अभिनव स्पर्धा ठेवण्यात आली होती त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळाला . प्रत्येक जण एका मिनिटाच्या वेळेत गोल आणि मोठ्यात मोठी पोळी लाटण्याचा प्रयत्न करीत होता, आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना प्रोत्साहन देत होते. 
 
 
यानंतर वेळ होती ती सुग्रास भोजनाचा आस्वाद घेण्याची. गरमागरम आणि चवदार अशा अनेक पदार्थांची रेलचेल असलेल्या मेजवानीवर सर्वांनी मनसोक्त ताव मारला. 
 
जेवणानंतर सर्व बैठे खेळ आयोजित करण्यात आले होते. या मध्ये फन क़्विज, आपल्या शहरासंबंधीच्या प्रश्नोत्तरांचा ग्रुप क़्विज, नवरा बायकोंनी आपापला एकच हात वापरून मुलांच्या वहीला कव्हर घालणे, बायकोने नवऱ्याला प्रपोज करणे अशा अनेक गमतीशीर खेळांचा समावेश होता. या सगळ्या खेळांनाही सभासदांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सर्वात शेवटी हाउसी खेळण्याचा आनंद सर्व लहान थोरांनी घेतला. त्यानंतर चहापान झाले आणि सहलीचा समारोप झाला. 
 
चांगले हवामान, चोख व्यवस्थापन आणि सर्व सभासदांचा उत्साही सहभाग यांमुळे मंडळाची हि वार्षिक सहल संस्मरणीय झाली. 

Newsletter

Contact us

You are here: Home News MMK Picnic 2015 Report