क्रिकेट प्रीमियर लीग 2017

News

मराठी भाषा दिवस-२०१६

नमस्कार , कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजराकेला जातो.या वर्षी महाराष्ट्र मंडळ, कुवैत च्या सर्व सभासदांनी दिनांक २६ फेब्रुवारी ला इंडिअन कम्युनिटीस्कूल, खैतान येथे एकत्र येउन मराठी राजभाषा दिवस साजरा केला. आपल्या मराठी भाषेचा प्रचार प्रसार करणे आणि सभासदांना आपले कलागुण प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा याकार्यक्रमामागचा हेतू होता. चहापानानंतर प्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी मराठी भाषेतविशेष योगदान केलेल्या काही दिग्गज व्यक्तिमत्वांच्या साहित्यप्रकाराचं सादरीकरण करण्याची संधीसभासदांना दिली होती. सभासदांनी सावरकर, शिरवाडकर, पाडगांवकर, शांताबाई शेळके तसंच गदिमांच्यासाहित्याच्या विविध छटा म्हणजेच साहित्य, गीतं, कविता सादर करून आपल्या प्रतिभेचं दर्शन घडवलं. मराठी भाषा दिवसाचं औचित्य साधून आपल्या सर्व बाल सभासदांमधेही मराठी भाषेची आवड आणिजाणीव जोपासण्याच्या उद्देशाने मंडळाने बालगोपाळांसाठी "उत्कृष्ट मराठी हस्ताक्षर " आणि "शुद्धलेखन"स्पर्धा आयोजित केली होती. पालकांनी आपल्या मुलांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उद्युक्त केल्याबद्दलत्यांचे तसेच स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार. या स्पर्धांमधे विजेते ठरलेल्या स्पर्धकांना परीक्षकांमार्फत बक्षिसंदेऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमादरम्यान मंडळाने नुकत्याच भरवलेल्या क्रिकेट टुर्नामेंटमधे विजेता व उपविजेता ठरलेल्या संघांनाचषक देऊन गौरवण्यात आलं. पानिपत , महानायक, संभाजी,झाडाझडती ,लस्ट फॉर लालबाग यासारख्या अनेक सुप्रसिद्ध कादंबऱ्यांचे लेखक श्री विश्वास पाटील या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 'मी आणि माझ्याकादंबऱ्या ' या त्यांच्या कार्यक्रमात श्री विश्वास पाटील यांनी , त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या मधील निवडकप्रसंग तसेच त्यांचे लेखन क्षेत्रातील विविध अनुभव श्रोत्यांसमोर मांडले. आपल्या खुमासदार शैलीनेऐतिहासिक प्रसंग त्यांनी रंगवून सांगितल्याने सर्व श्रोते त्यामध्ये हरवून गेले. मराठ्यांचा गौरवशालीइतिहास ऐकताना सर्व श्रोते भारावून गेले आणि काही प्रसंग सांगताना तर श्री. पाटील यांनी श्रोत्यांच्याअंगावर रोमांच उभे केले. कार्यक्रमाच्या अंती सर्व सभासदांनी त्यांच्या मनात असलेले इतिहास, लेखन,साहित्य तसेच मराठी भाषेचं भवितव्य या संदर्भातले अनेक प्रश्न श्री. विश्वास पाटील यांना विचारले आणित्यांची समर्पक उत्तरं देऊन त्यांनी श्रोत्यांचे शंका निरसन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. संकष्टी चतुर्थी असल्यामुळे मंडळाने कार्यक्रमानंतर सभासदांसाठी खास फराळाची सोय केली होती.साबुदाण्याची खिचडी, बदामाची बर्फी आणि ताक असा बेत होता. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला सभासदांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. कार्यक्रमाच्या आयोजनामधे काही त्रुटी राहिल्या असल्यास त्या अवश्य कार्यकारी समितीच्या कानावरघालाव्यात. त्या सुधारण्याचा प्रयत्न कार्यकारी समिती नक्कीच करेल. धन्यवाद !!

Marathi din

Makar Sankranti 2016

नमस्कार,

शुक्रवार २९ जानेवारी २०१६ रोजी मंडळाचा नवीन वर्षाचा पहिला मकरसंक्रांतीचा कार्यक्रम उत्साहात पारपडलाअतिशय कडाक्याची थंडी असूनही आपण सर्वजण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल आपले आभारहळदी कुंकू समारंभ आणि तिळगुळाच्या गोडव्याने कार्यक्रमाला सुरुवात झालीसुरेख रांगोळीने आनंदाने स्वागत केले आणि सभागृहाच्या कलात्मक सजावटीने विशेषलक्ष वेधून घेतले.

यानिमित्ताने "कचऱ्यातूनकलायास्पर्धेला आपला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि कार्यक्रमाला शोभा आली . टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या इतक्या सुंदर आणि कलात्मक वस्तू  आणि त्यांची सुरेख मांडणी सभासदांमधील कल्पकता दर्शवतात.

चहापानानंतर लहान मुलांनी की-बोर्डच्या साथीने गणेशवंदना सादर केली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.

आपलेपाहुणे श्रीद्वारकानाथ संझगिरी यांनी ओघवत्या पण अगदी हलक्याफुलक्या शैलीत आपल्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या लिजण्डस्च्या आठवणींची आणि त्यांच्या आयुष्याची सफर घडवून आणलीरंजक माहिती व किस्से आणि त्याला ऑडियो व्हिजुअलस् ची जोड यामुळे कार्यक्रम अधिकच खुलत गेला आणि या लिजण्डस् च्या भेटीचा आपण सर्वांनीही मनमुराद आनंद लुटला. 

आशा आहे की आपल्याला संपूर्ण कार्यक्रम आवडला असेल. आयोजनात काही त्रुटी राहिल्या असल्या सक्षमस्व.

कळावे, लोभ असावा ही विनंती.

धन्यवाद !!

Makarsankrati16

'Just हलकं फुलकं '

काल महाराष्ट्र मंडळात 'Just हलकं फुलकं' या धम्माल नाटकाने दिवाळीच्या आगमनाची नांदी झाली.… आणि वातावरण  आनंदाने भरून गेले !!

सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे या अफलातून जोडीने धमाल उडवून दिली. दोघांचे कॉमेडी चे टायमिंग म्हणजे कमाल…  कसदार अभिनय,  विनोदाची उत्तम जाण आणि त्यातला सहजपणा यांमुळे प्रयोग खूप रंगत गेला. या दोघांबरोबरच या नाटकाचा तिसरा खांब म्हणजे अभिनेत्री अनिता दाते. एके काळी रसिका जोशींनी साकारलेल्या या भूमिकेचं आव्हान तिने तितक्याच ताकतीने पेललंय.  हे नाटक कुठेही थांबत नाही …. अतिशय वेगाने बदलत जाणारे सीन्स् त्याबरोबर बदलणारे वातावरण हेच त्याचे खरे वैशिठ्य !! सागर कारंडे आणि अनिता दाते दोघेही किती पटापट त्यांचे गेट अपस् आणि मूडस् बदलत होते आणि अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून लीलया वावरत होते … एक अचाट एनर्जीने भरलेला मनोरंजनाचा अॅक्शन पॅकड्  परफॉरमन्स !!! तीन तास सभागृहात अक्षरशः हास्याचे धबधबे कोसळत होते आणि लहान-थोर सर्वच प्रेक्षक लोटपोट हसत होते. अद्ययावत सभागृह, उत्तम नेपथ्य आणि त्याला पूरक ध्वनी आणि प्रकाश योजना यांमुळे नाटकाचा प्रयोग बहारदार झाला. त्याला साथ लाभली आपणा सर्वांच्या सहकार्याची आणि पाठिंब्याची !! 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अल मुल्ला ग्रुपचे श्री. व सौ. दावर तसेच श्री.व सौ जोशी व  श्री.व सौ. गयरोला यांनी आपुलकीने उपस्थित राहून मंडळाच्या सभासदांशी त्यांची बांधिलकी दृढ केली.

काही वेगवेगळे पण दर्जेदार कार्यक्रम आपल्यासाठी सादर करण्याच्या समितीचा प्रयत्न आपल्या पसंतीस उतरला याचा खूप आनंद होतोय… टेन्शन फ्री आणि आनंदाच्या वातावरणात सुरु झालेली ही दिवाळी आपणा सर्वांच्या आयुष्यात असेच समाधानाचे हास्य आणि सुख शांती घेऊन येवो ही कार्यकारीणी तर्फे शुभेच्छा !!

कार्यक्रमाच्या आयोजनात काही त्रुटी राहिल्या असल्यास क्षमस्व. 

कळावे, लोभ असावा ही विनंती !!

Newsletter

Contact us

You are here: Home News