दिवाळी सोहळा

कार म्युझियम

कोजागिरी पौर्णिमा दांडिया

गणेशोत्सव- २०१७

Feedback

Mrs. Preeti Kolekar ह्यांनी ३१ मार्च रोजी(सहल वाफ़राह)

महाराष्ट्र मंडळाची सहलीची इमेल आली आणि मनात हुरहूर सुरु झाली, एरवी कधी तरी भेटणाऱ्या आणि ज्यास्त फोन वर होणार्या मैत्रिणी सोबत च्या गप्पा आता प्रत्यक्श… खरय, आम्हा बायकांना गप्पा मारायला बहाणा हवा असतो…

२२ मार्च ला मुलाची बोर्ड पण संपणार होती, छोटू ला शाळेला अवकाश आणि मला Spring Break …मग त्यात पिकनिक म्हणजे अगदी योग्य मुहुर्तावर…. तसा ह्यातला काहीही नसता तरीही पिकनिक तर झालीच असती…

शुक्रवारचा दिवस उजाडला… आता मस्त मज्जा… सल्मिया गार्डन ला पोहोचले तेव्हा बसेस भरत होत्या, बरीचशी मंडळी आधीच बस मध्ये होति… अगदी छोटी छोटी पिल्ला पासून आजी पर्यंत सगळे सज्ज… थोडे Instructions आणी थोडी गम्मत…. मज्जा सुरु झाली… माझे आवडते सवंगडी पिटुकले सगळे पण सुरात सुरात सूर मिळवायला तैयार… अंताक्षरी सुरु झाली…अगदी १ तास लोटला तरी कुणीच हम किसी से काम नही…बाहेर बघितले तर समजले अरे आपण पोहोचलो देखिल…

वातावरण एकदम झकास… Entry करतांना मागे वळुन पहिले तर प्रत्येक बस ला एक छान पैकी नाव दिले होते। आमची सिंहगड एक्स्प्रेस… आत शिरलो तर मस्त पुणेरी पाट्या, वाचून कुठेतरी मन मिश्किल हसत होते. …कमेटी वाले रंगीबेरंगी टोप्या घेऊन हजर…. आणि सोबत रंग पण … पुसला कि परत लावायचे…

छान एक टेन्ट आणी आत खाण्या-पिण्या ची सोय… गरमा- गरम इडली संभार वर ताव मारला…सोबत चहा होता…पण चहा तर आपण पीत नाही… I hope पुढल्या वेळेस कॉफी पण असेल…

जर ताजे तवाने होऊन आलो तर games सुरु झाले… आधी मोठ्यांचे मग लहान मुलांचे… टेन्ट मध्ये झालेल्या खेळांमध्ये संगीत खुर्ची, How much you know your spouse (काश वो साथ होते )…पण बघण्यात ही तेवढीच मज्जा येत होती… प्रश्न पण छान होते …नन्तर फार्म च्या भेटी ला गेलो… वांगी, बिन्स, टोमाटो…माळ्याच्या मळ्या मध्ये कोण ग उभी अशे एक मेकीना चिढवत परत आलो तर जेवण तयार…

मेजवानी छान होती, प्रत्येक गोष्टी च्या मागे समिती ने घेतलेले कष्ट आणि जबरदस्त planning दिसून येत होते… अगदी अगदी रांगा सांभाळण्या पासून ते पान वाटप सगळे fair distribution... विडा खाऊन टशन है बॉस !!!

जेवणं झाली कि परत खेळ सुरु… Mrs MMK... अगदी मज्जा आली खेळायला आणि नंतर अहो ने पावडर मधून कोइन काढून दुसरा नंबर पटकावला… तर आपले कोलार tight!!!...Mrs MMK पण खास सखीच जिंकली होती…मज्जाच मज्जा ….

थोड्या वेळाने बाहेर आलो तर एक मैत्रिणीची नवीन कोरी गाडी वाळूत फसलेली…आणी ती बाहेर काढण्यात पुरुष मंडळी ची झालेली मशाकत… चांगलाच अनुभव होता… नंतर होळी ची गाणी, रंग खेळणे आणि dance ह्याने एका खास दिवसाची सांगता झाली

असा एक अविस्मरणीय दिवस आम्हाला दिल्या बद्दल समिती चे खूप खूप आभार आणी आता पुढच्या कार्यक्रमा साठी आमच्या अपेक्षेचा थर उंचावलाय बर का so be ready....

 


स्मिता काळे ह्यांनी २३ मार्च रोजी(सहल वाफ़राह)

वाफरा  सहल  छान झाली . "पुणेरी पाट्या"  वाचून "टोपी" उडाली ....कल्पना एकदम  मस्त ...... जेवण मस्त, सगळ्या कमिटी मेंबर चे आणि  .अभिनंदन ...

 


Mrs. Kumbhar ह्यांनी २३ मार्च रोजी(सहल वाफ़राह)

महाराष्ट्र मंडळ कुवेत..... तुमच्या पहिल्याच कार्यक्रमाची सुरुवात छान झाली संगत रंगत ने सगळयांची मने जिंकली........वाफरा पिकनीक मध्ये तर खूपच धमाल आली नवीन मराठी बांधवांच्या ओळखी झाल्या ,लहानमोठ्यांचे खेळही खूप मस्त होते,एक म्हणजे जेवण खूपच रुचकर होते , खूप धमाल आली ती शेवटचा कार्यक्रम DJ ने .......खूप खूप आभार MMK असेच पुढे छान कार्यक्रम देणार ह्यात शंकाच नाही ............धन्यवाद .all the MMK comittee Memebers....

 


Mrs. Mugdha Gautam Sarnaik ह्यांनी २३ मार्च रोजी(सहल वाफ़राह)

Dear MMK Committee

Congratulations for successful and well organised Picnic event. Surprise of Puneri Patya, Selection of good venue and provision of big tent and villa for members keeping in mind Kuwait weather, Games for all age groups and good food arrangement exhibited good planning , innovative thinking and gr8 efforts.

Best wishes for all future events and Keep rocking.

 


K. Shirsath ह्यांनी २२ मार्च रोजी(सहल वाफ़राह)

Today's was a very well organized picnic and a joy forever for all. The committee members deserve special appreciation for their planning and hard work.

Well done, and thanks for all that you have done for all.

 


जयश्री अंबासकर ह्यांनी २२ मार्च रोजी(सहल वाफ़राह)

महाराष्ट्र मंडळाची आजची पिकनिक एकदम झकास झाली.

बसचा प्रवास, फ़ार्मवर पावलोपावली लावलेल्या पुणेरी पाट्या, गरमागरम नाश्ता, खेळ, गाणी, जेवण......सगळंच एकदम मस्त !!

जागेची निवडही जबरी ! उत्कृष्ठ आयोजन !!

सगळ्यात शेवटी झालेला डान्स तर फुल्टू धम्माल !!

आमच्या आजच्या दिवसभराच्या मज्जेसाठी सगळ्या कमिटी मेंबर्सना मनापासून धन्यवाद !!

 


अभिजित कुलकर्णी ह्यांनी  १७ डिसेंबर रोजी(वार्षिक स्नेहसंमेलन)

सस्नेह नमस्कार. 

कुवेतमधील रसिक मंडळींनी दिलेली दाद, टाळ्या, हशा आणि दिलेला आपलेपणाचा आहेर घेउन मी पुण्यात आलो खरा,

पण अजुनी तिथल्या शाळेच्या प्रांगणातच वावरतोय.

कुवेतकर मंडळीनी केलेले नृत्य, फडकावलेले झेंडे दिसतायत.

आठवले काकांनी पोस्टमनच्या रुपात व्यक्त केलेल्या भावना किती योग्य आणि समर्पक होत्या !

तिथे जे जे पहिले, ते पुन्हा पुन्हा सहजच नजरेसमोर येतेय.

सर्वाना सामावून घेउन ' रुजवू मराठी ' हे ब्रीद सार्थ होते आहे,

याची पावती यानिमित्ताने अनुभवायला मिळाली.


समस्त कुवेतकर मंडळींचे अभिनंदन... आभार...!

 


Mohan & Amita Singh ह्यांनी १५ डिसेंबर २०१२ रोजी (वार्षिक स्नेहसंमेलन)

MMK Annual Day program was very nice. Well organized and was full of breathtaking cultural programs.

Bache Company Rocks and Committee Members dance performance was a pleasant surprise!

Chaitanya Kulkarni and group took audience in Trance. In Kuwaiti Desert, audience again found oasis because of MMK Committee 2012.

Many thanks and Congratulations to MMK 2012 Committee members.

Best wishes for MMK 2013 Committee.

 


Aparna Wankhade ह्यांनी १५ डिसेंबर २०१२ रोजी (वार्षिक स्नेहसंमेलन)

Friday's annual event was superbly organised..many congratulations to the committe2012..

All the stage performances were superb and the commitee performance added glaze to it..The sangeet mahfil was great..Hats off to Chaitanya Kulkarni!!

thanx!! 

 


Dr. Sonali Desai ह्यांनी १५ डिसेंबर २०१२ रोजी (वार्षिक स्नेहसंमेलन)

Salam Trunaicha.........excellent programe........indeed wonderful experience to listaen live marathi songs in Kuwait by professional singers..........Thanks to Maharashtra Mandal.

 


सौ. मृण्मयी आठलेकर ह्यांनी १५ डिसेंबर २०१२ रोजी (वार्षिक स्नेहसंमेलन)

महाराष्ट्र मंडळ समिती २०१२

कालचा कार्यक्रम खूपच छान होता.......मुलांच्या डान्सेस नि खूपच धम्माल आणली आणि सगळ्यात मोठ्ठ सरप्राईझ दिले ते महाराष्ट्र मंडळ समितीने.....तुम्हा सगळ्यांचा डान्स मस्तच होता.

शेवटी असलेला प्रोग्राम म्हणजे "सलाम तरुणाई चा"..... That was awsooooom........चैतन्य आणि टीम ने तर कमालच केली...सई आणि चैतन्य ह्यांचा आवाजावर केवढा control आहे....आणि विक्रम भट आणि अजय गाडगीळ हे दोघेही लाजवाब आणि सगळ्यात कहर म्हणजे अभिजित कुलकर्णी ह्याचं निवेदन....त्यांनी निवेदनातून आम्हाला पुन्हा आमच्या लहानपणीची आठवण ताजी केली रेडीओ ची आठवण करून. ...so overall the programm was SUPERB!.........

ABHINANDAN

 


Rahul A. Kulkarni on 30 November 2012 ( All the  Best )

All the best he natak Khup chaan Zale.. Jabriya chaya hall mule khup chaan vatlee...it's always better than khatan school hall...... 

 


श्री संदीप लेले ह्यांनी १८ नोव्हेंबर २०१२ रोजी (All the Best)

With reference to my previous comment श्री संदीप लेले ह्यांनी ६ मे, २०१२ रोजी (काटकोन त्रिकोण) where I wrote “Anxiously waiting for the next BLOCK BUSTER”, indeed there was one more surprise in the offing “All the Best”.

A fast paced play with continuous volley of laughter which did not give a second chance to the audience to hold their laughter. Marvelous program.

 


Mrs. Bhagyashri Koranne on17 November2012 (All the Best )

What is most difficult is too make someone laugh by giving him a moment of joy and fun. We really appreciate that our committee members of MMK 2012 , has taken a great effort and given as this precious moments by presenting us a beautiful play "All the best ". We all really enjoyed and were thrilled with the excellent performance by  all the artists.

Thank you for your great effort.  


Ajit joshi on 16 November2012 (All the Best)

Mandalachi Diwali bhet khup avadli. navapramane BEST...

 


Madhusudan J Mulik on 07 November 2012 for (IIK Diwali Mela)

महाराष्ट्र मंडळ कुवेतच्या कार्यकारी समितीने दिवाळी मेळ्यात सक्रिय सहभाग घेऊन मंडळाच्या सदस्यांना अजून एक मंच उपलब्ध करून दील्या बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन!! मेळ्यात मराठीचा ध्वज उंचावणाऱ्या सर्व कलाकारांचे आणि विजेत्यांचेही हार्दिक अभिनंदन!!!!!!! 

 


Mohan & Amita Singh on 23 October 2012 for (नवरात्रोत्सव)

Very good and well organized program.

Hats off to little champs!

Playing Garba & Dandiya was energetic and enthusiastic experience. Music DJ played very good numbers.

Many thanks to MMK 2012 committee. Eagerly waiting for upcoming program.


Mohan & Amita Singh

 


Mrs. Aparna Sujit Wankhade on 21 October 2012 for (नवरात्रोत्सव)

The total event was very good. Little champs rocked the stage..njoyed Garba n Dandiya.Thanx to MMK 2012 commitee.

 


भावना कुलकर्णी ह्यांनी २० ऑक्टोबर २०१२ रोजी (नवरात्रोत्सव)

काल मंडळाचा कार्यक्रम उत्तम झाला .

प्रत्येक कलाकार चा performance अतिशय सुंदर आणि प्रेक्षणीय होता .

सर्व बाल आणि मोठ्याचे अभिनंदन .

 


सौ जयश्री अंबासकर ह्यांनी २२ सप्टेंबर २०१२ रोजी (गणपती बाप्पा मोरया!)

ह्या वर्षीही गणपतीसाठी उमा, सचिन कंग्राळकर आणि मनिष आंबेकर ह्यांनी केलेली सजावट अप्रतिम! रंगसंगती अतिशय सुरेख!! बाप्पाचं दर्शन घेतांना फार प्रसन्न वाटलं. बाप्पाचा आशीर्वाद असाच तुमच्यावर कायम असो!!

अविनाश आणि जयश्री अंबासकर

 


डॉ. सोनाली देसाई ह्यांनी ९ मे, २०१२ रोजी (काटकोन त्रिकोण)

I m very thankful to u for such a amazing drama...............as if sitting in "balgandharv" in Pune & watching it,,,,,,,"chahapan" was all time favourite................felt that visited Pune in a day................hope to see more & more nice dramas here..........!!!!!!!!

 


स्नेहलता रं. आठलेकर ह्यांनी ७ मे, २०१२ रोजी (काटकोन त्रिकोण) 

मी पुण्यात राहणारी एक महाराष्ट्रीअन स्त्री....मला कुवैत सारख्या अरब देशात येऊन "काटकोन त्रिकोण " सारखे एक दर्जेदार नाटक बघायला मिळावे हा एक योगायोगच म्हणावा लागेल. खरतर मी नाटकाची फारशी शौकीन नाही परंतु काटकोन त्रिकोण हे एक कौटुंबिक आणि वास्तवाला धरून असलेले नाटक असल्यामुळे आणि मधून मधून विनोदीही असल्यामुळे नाटक बघताना कंटाळवाणे झाले नाही. नाटकातील कलाकारही त्या त्या भूमिकेशी समरस होऊन ती व्यक्तिरेखा साकारात होते त्यामुळे नाटकाचा खरा आनंद घेता आला.
तसेच मंडळाने नाटकाचे आयोजनही फार छान केले होते...सेट बघून तर कोणी म्हणणार हि नाही कि हा इथेच तयार केलेला सेट आहे . प्रमुख पाहुण्यांचे, कलाकारांचे, स्वागत व त्यासाठी केलेली मराठमोळी वातावरण निर्मिती खास उल्लेखनीय होती असेच म्हणावे लागेल. सर्व महिलांना मोगऱ्याचे गजरे व सर्वाना कैरीचे पन्हे देऊन उन्हाळ्याचा उष्मा कमी करण्याचा प्रयत्न तर अजूनच स्तुत्य म्हणावा लागेल. आणि त्यातच मध्यंतरात "वडा पाव" सारखी अगदी खास असा मराठी नाश्ता खाऊन तर अगदी महाराष्ट्रातल्या नाट्यगृहात नाटक बघितल्यासारखे वाटले. महाराष्ट मंडळाने असेच सुंदर सुंदर कार्यक्रम द्यावेत हीच मराठी मनांची अपेक्षा.
धन्यवाद. 

 


Mr. Nilesh Attarde ह्यांनी ७ मे, २०१२ रोजी (काटकोन त्रिकोण)

The program was fantastic....story was heart touching and the message was nicely presented. Thanks to the whole team of Katkon Trikon and specially our mandal organisers.

 


श्री श्रीयश जोशी ह्यांनी ६ मे, २०१२ रोजी (काटकोन त्रिकोण)

Thanks a lot for an evening well spent! Kudos to the oranising team, to put up such a wonderful show.  

श्री मधुसूदन मुळीक ह्यांनी ६ मे, २०१२ रोजी (काटकोन त्रिकोण)

महाराष्ट्र मंडळ कुवेतने चार मे ला महाराष्ट्र दिना निमित्त दिलेल्या मेजवानी साठी ह्या वर्षीच्या कार्यकारी समिती चे आभार आणि हा कार्यक्रम प्रायोजित केल्या बद्दल अल्मुल्ला एक्स्चेंज चे विशेष आभार. नाटकाबद्दल आणि त्यातील अभिनेत्यांबद्दल काय बोलणार? ते होते शब्दांच्या पलीकडले!
जेष्ठ कलाकार्मी डॉक्टर मोहन आगाशे ह्यांना मानपत्र आणि श्री दावर ह्यांना पुणेरी पगडी देण्याची कल्पना खूपच आवडली, मानपत्राचा मजकूरही छान होता. श्री दावर ह्यांनी मोठ्या मनाने पुढील दहा वर्षे मंडळाला असेच सहकार्य करण्याचे बोलून दाखविले. ह्याचा लाभ मंडळाने घ्यावा आणि आपण सगळ्या सदस्यांनी अल्मुल्ला एक्स्चेंजचा वापर करून ह्याची परतफेड करावी. स्वानुभवाने मी सांगू इच्छितो की, अल्मुल्ला एक्स्चेंज ची ऑन लाईन सेवा नोंदणी करण्यास अन वापरण्यास खूप सोपी ,सुटसुटीत आणि तत्पर आहे.

कार्यकारी समितीस येणाऱ्या कार्यक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा

 


श्री संदीप लेले ह्यांनी ६ मे, २०१२ रोजी (काटकोन त्रिकोण)

Ever since the new committee has taken over the reins, there is no dearth of the quality programmes.

Myself, born and brought up in North India have a little touch of the Marathi theatre. But I was aghast by the wonderful presentation of the play (काटकोन त्रिकोण).

The pleasure was further magnified by the sumptuous “Vada Pav” which was the perfect occasion and matching with the post interval curiosity (???).

All the time, the audience was glued to the feeling “What next”…..and that was the focal point of the entire episode.

Nevertheless, I hope that MMK committee will bring / present such quality programmes in the near future. The efforts of the MMK has always been “to bring the platform to the audience rather than vice- versa”

Anxiously waiting for the next BLOCK BUSTER.

 


सौ जयश्री अंबासकर ह्यांनी ५ मे, २०१२ रोजी (काटकोन त्रिकोण)

कितीतरी दिवसानंतर एक अतिशय दर्जेदार व्यावसायिक मराठी नाटक कुवेतकरांना बघायला मिळालं. ह्याचं सगळं श्रेय कार्यकारी समितीला.... !!

Al-Mulla ची मिळालेली Sponsorship म्हणजे तर केकवरचं नुसतं आयसिंगच नाही तर त्यावरची चेरी सुद्धा !!

आल्याबरोबर झालेलं सुगंधी स्वागत.... प्रत्येकीला मिळालेला गजरा शिवाय तो लावायला क्लिप... अतिशय कल्पक !! मोगरा तर संपूर्ण चार तास दरवळत होता. थंडगार पन्हं पितांना गप्पांची मैफिल पण मस्त रंगली होती. मराठमोळे सरदार आणि ललना अगदी झोकात होते. अगदी भारतात नाटकाला गेल्यासारखं वाटत होतं.

मान्यवरांच्या सत्कारामधला Al Mulla च्या डावर ह्यांचा पुणेरी पगडी देऊन केलेला सत्कार खासच !!

नाटक जेव्हा सुरु झाले तेव्हापासून जी प्रेक्षकांची पकड नाटकाने घेतली ती मध्यांतरात वडा-पाव खातांना सुद्धा तशीच होती. कलाकारांचा सहज सुंदर अभिनय नाटकाला किती उंचीवर घेऊन जाऊ शकतो हे अनुभवायला मिळालं. संदेश कुलकर्णी, केतकी थत्ते आणि डॉ.मोहन आगाशे ह्या कलाकारांनी सादर केलेला हा नाट्याविष्कार केवळ लाजवाब !! संवाद फारच खुसखुशीत , वेळोवेळी चिमटे काढणारे आणि खाडकन डोळे उघडणारे सुद्धा होते. प्रत्येक संवाद प्रत्येक नवरा, बायकोला अगदी चपखल बसणारा !! कधी हसवणारा, कधी गहिवरुन टाकणारा तर कधी मनापासून पटल्यामुळे ओशाळवाणं करणारा सुद्धा !! नाटकाचा शेवट सुन्न करणारा, मनात हुरहुर जागवणारा, विचार करायला भाग पाडणारा !! घरी जातांना नाटकाचा ज्वलंत विषय, कलाकारांचं अभिनयसामर्थ्य..... हेच डोक्यात घोळत राहिलं.

उज्ज्वला आणि दिनेश कुमठेकर ह्यांनी आजी, आजोबा झाल्याचा सगळ्यांसोबत साजरा केलेला आनंद, समारंभाची गोडी अधिकच वाढवून गेला. त्यांचं अभिनंदन आणि बाळाला खूप खूप आशीर्वाद !!

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मिळालेल्या ह्या खास नजराण्यासाठी तहे दिल से शुक्रिया

महाराष्ट्र मंडळ, कुवेत...... चिरायु होवो !!!!!!

 


डॉ. अदिती जुवेकर ह्यांनी ५ मे, २०१२ रोजी (काटकोन त्रिकोण)

Hearty congratulations for successfully organizing Maharashtra Day.All arrangement's were perfect.

We look forward to such great programs ahead in the year.

 


श्री. दिलीप सावंत ह्यांनी ५ मे, २०१२ रोजी (काटकोन त्रिकोण)

महाराष्ट्र मंडळ कुवेत आयोजित मराठी नाटक "काटकोन त्रिकोण" पाहिले.

गिरीश जोशी दिग्दर्शित अप्रतिम, दर्जेदार नाटक. गंभीर विषय, खुशखुशीत मांडणी, सहज सुंदर अभिनय- मोहन आगाशे, संदेश कुलकर्णी("मसाला" चा दिग्दर्शक), केतकी थत्ते.

या वर्षीचा मंडळाचा हा दुसरा कार्यक्रम. पहिला कार्यक्रम होता "छोटा प्याकेट बडा धमाका". खरे सांगायचे तर "उथळ" आणि "दर्जेदार" या दोन शब्दांचे अर्थ कुणाला समजावयाचे असल्यास या दोन कार्यक्रमांची तुलना पुरेशी आहे.

समितीच्या सदस्यांना मात्र मानले पाहिजे. दोन्ही कार्यक्रमांचा गाभा होता " दोन पिढ्यातील हरवत चाललेले नातेसंबध". देश, घर आणि म्हातारे आई वडील यांच्या पासून दूर राहत असलेल्या मंडळाच्या सभासदांना यावर्षी अंतर्मुख करायला लावायचा चंग बांधलेला दिसतो आणि या दुसऱ्या कार्यक्रमाने मंडळाचा तो प्रयत्न पुरता यशस्वी केला.

"काटकोन त्रिकोण " हे खरे तर अवघड नाटक. सासरे, त्यांचे म्हातारपण , त्यांच्या अपेक्षा, मुलगा आणि सून यांची आपणा सर्वांच्या सवयीची वर्तणूक, बुद्धी आणि प्रेम यातला संघर्ष, त्यातूनचे एकाकीपण आणि हे सर्वांचे अगदी भूमितीचा प्रमेय सोडवावा एवढ्या सफाईने केलेले सादरीकरण.

हे नाटक म्हटले तर सस्पेन्स थ्रील्लर आहे , म्हटले तर उपहासात्मक विनोदी नाटक आहे .. पण सर्वात महत्वाचे म्हणजे आशयघन गंभीर नाटक आहे.

आपण विदेशात रहात असताना काही चांगले पहायची, ऐकायची आपल्याला उपासमार होत असते. हे नाटक हि प्रतिभेची भूख भागवणारे आहे.

नाटक सुरु होते तेव्हा इन्स्पेक्टर बापट (डॉक्टर मोहन आगाशे ) आलेले असतात भक्ती (केतकी थत्ते ) आणि राहुल (संदेश कुलकर्णी) यांच्या घरी... केसचा नव्याने तपास करण्यासाठी. सासरे आबा हॉस्पिटल मध्ये असतात बेशुद्ध्ध; गच्चीतून पडल्यामुळे.

सासरे आणि सून, मुलगा आणि वडील , मुलगा आणि सून; हि तीन नाती या त्रिकोणाच्या तीन भुजा. जशी जशी हि नाती ताणली जातात किंवा जवळ येतात तसे तसे या त्रिकोणाचा समभूज , समद्विभूज आणि काटकोन त्रिकोण होतो.

हा अपघात. आत्महत्या कि खून ?

"खरे तर आपण एकदा गुन्हेगार कोणाला ठरवायचे ते नक्की केल्यावर पुरावे आपोआप त्याप्रमाणे गोळा होतात" या भोवती नाटक घुमत राहते.

राहुल एका प्रसंगात म्हणतो - मी ज्याचे चुकत असेल त्याला झापायचो. तेव्हा इन्स्पेक्टर त्याला सांगतो " रागावलेल्या बायकोला कुशीत घेऊन पाच मिनिटात तू शांत करत असशील .. पण बिचारे आबा रात्रभर अंथरुणात हमसून रडत असतील .. त्याचे काय ?"

एकले एकले आयुष्य जगत असलेल्या म्हातार्या पालकांना पुढची पिढी किती समजून घेते? किती वेळ देते ?

खरे तर इन्स्पेक्टरचा राहुल ला शेवटचा प्रश्न " सगळ्यात शेवटी किती दिवसांपूर्वी तू वडिलांना स्पर्श केला होतास? " एक विदारक सत्य आपल्या समोर मांडतो .

विवेक बेळे यांनी मोठ्या कुशलतेने हा विषय हाताळलेला आहे आणि दिग्दर्शक गिरीश जोशी यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.....

Rating- XXXXX (5 stars) 

 


सौ. अपर्णा वानखेडे ह्यांनी ५ मे, २०१२ रोजी (काटकोन त्रिकोण)

Yesterdays Maharashtra Day celebration event by MMK was fantastic.It was great to see the live performance of Dr. Mohan Agashe and so was the play(Natak)."Gajara"and "Vada-pav"gave the real feel touch to it.Thank to MMK2012 committee.

 


श्री. किशोर खनके ह्यांनी ५ मे, २०१२ रोजी (काटकोन त्रिकोण)

The "Katkon Trikon" drama was fabulous. Even my daughter Kasturi thoroughly enjoyed it . A VERY BIG THANK YOU goes to Aniruddha Paithankar who successfully spearheaded project "Al-Mulla sponsorship" which is the first of its kind to get exclusive full sponsorship for an event.

 


कुमार ओम मुळीक याने मार्च ३०, २०१२ रोजी (धमाल किट्को भेट!)

My KiTCO Visit

Hi Friends!

Enjoying holidays? I am also enjoying, tour out of Kuwait for a week, then “Kahani”, outing, hoteling, etc. In spite of holidays and Friday this morning I got up early, obviously for MMK’s visit to the KiTCO factory which is famous for its chips, biscuits and other snacks.

I got up early and went to the Abuhalifa /Madina, where everyone was supposed to assemble. Due to rain yesterday night it was very cold. Bus came on right time, everyone got in and we left for KiTCO. It took us 30 to 40 minutes to reach the factory. We queued there and were eagerly waiting to see what is happening inside. We got the permission and also a chef’s cap and then yes….we were in Chips Section.

You know how they make Chips in mass quantity? I saw it!!

First they take out the potatoes from the bags and put them in a pipe this leads them to a continuously rotating container which has blades, this is peeler. Here all potatoes are peeled off. Potatoes are removed from this big peeler. Further they are washed vigorously and also starch is removed. Then potatoes are passed on belt, where some people cut them in to halves, and are carried to slicer. There they are sliced into thin slices. These slices are washed and the left over starch is again removed. These wet slices are sent to oven for drying. In this they are harden up and seem to be fried, but they are not. Then they are filled up in small trays and are sent for flavoring. Finally measured quantity of chips are filled into packets and sealed.

Friend’s good news for us is “Chips are not fried”

Next section was biscuits making:

Initially they make dough of flour and water to turn it into a paste. Then they pour this paste in to variety of molds and pass it to oven to bake it at 60 degrees for 6minuites. After baking, some people arrange them properly and put them in a rack. Further there is a roller with a small machine; this small machine spreads cream over the roller. Biscuits are passed under the roller and the cream is put on the biscuit, this is the lower part of cream biscuit. Then upper part of the biscuit is placed and pressed lightly by a metal strip so that, cream doesn’t come out. Finally yummy cream biscuits are wrapped and filled into packets.

When we left we were supposed to come back by 11.30-12, but we reached home early and Aai, Baba and sis was surprised to see me back early and that too, with a big KiTCO Gift pack, full of all types of chips, biscuits, glowing batch and a cap.

Friends it was a very informative Factory visit and we all enjoyed it. This gave us a chance to meet all friends and geared us up for School reopening. I thank MMK for arranging such a nice factory visit.

Bye, friend’s and all the best for next school session. 

 


सौ. संगीता संतोष खरात ह्यांनी मार्च १ ३, २०१२ रोजी (छोटा पॅकेट बडा धमाका)

होलीनिम्मित झालेला छोटा packet बडा धमाका कार्यक्रम छान झाला. रमा व चैतन्य कुलकर्णी यांनी गोड गाणी गायली. एकूण कार्यक्रम चांगला झाला. matching तडका छान वाटला. पुढचा वेळी कपडे खरेदी करताना matching करून घेयला हवेत.

समितीचे आभार व अभिनंदन.

परीक्षा असल्यामुळे काहीजण कार्यक्रमला येऊ शकले नाहीत याची नोंद घ्यावी.

 


श्री सुनिल विपट ह्यांनी मार्च ११, २०१२ रोजी (छोटा पॅकेट बडा धमाका)

Though I could not enjoy the program since being away from Kwait, I saw the photo album and felt that the program was a great success. Participation of MMKW members with great enthusiam along with the artists was a heartening feature. 


Keep up the good work & scale greater heights.

 


सौ. मृण्मयी आठलेकर ह्यांनी मार्च ११, २०१२ रोजी (छोटा पॅकेट बडा धमाका)

महाराष्ट्र मंडळ कुवैत ने जो होळी निमित्त कार्यक्रम केला त्या बद्दल सर्वात आधी त्यांचे अभिनंदन कारण इतका वेल ऑर्गनाइझ कार्यक्रम झाला कि थोडा उशिरा चालू होऊन सुद्धा वेळेत संपला आणि कुठलीही गडबड न होता संपला.......धन्यवाद छान कार्यक्रम दिल्या बद्दल....इथून पुढे सुद्धा असेच सुंदर कार्यक्रम द्यावेत हि अपेक्षा!

 


सौ अपर्णा जोशी ह्यांनी मार्च ११, २०१२ रोजी (छोटा पॅकेट बडा धमाका)

छोटा पॅकेट बडा धमाका हा रंगीबेरंगी कार्यक्रम एकदम झकास! मस्त !!

कमी वेळात छान कार्यक्रम दिल्याबद्द्ल कमिटीला धन्यवाद....
नवोदित गायकांनी सुंदर आणि सगळ्यांच्याच आवडीची गाणी सादर केली. भार्गवी चिरमुले बद्दल काय बोलणार???? शब्दच नाहीत ....

 


सौ गीता मधुसूदन मुळीक ह्यांनी मार्च ११, २०१२ रोजी (छोटा पॅकेट बडा धमाका)

दिनांक ९ मार्च रोजी उडालेला छोटा पॅकेट बडा धमाका खूपच छान वाटला.वेळ कसा गेला कळलेच नाही.कार्यक्रम अजून हवा होता असे वाटत असतानाच कार्यक्रम संपला कधी कळलेच नाही.छान कार्यक्रम दिल्याबद्दल कमिटीचे खूप खूप आभार!!!

 


श्री भुषण ओक ह्यांनी मार्च १०, २०१२ रोजी (छोटा पॅकेट बडा धमाका)

The program organized on the "Holi" occasion was an excellent one as usual. More satisfying was the overall organization by the new committee and the way everything was handled. The last committee had already raised the bar quite a bit and the new committee rang true to those high expectations. Special mention must be made for the anchor who did so well to really communicate with audience. I'm really amazed at the talent available with MMK.

Thanks a lot and congratulations again.

 


सौ जयश्री अंबासकर ह्यांनी मार्च १०, २०१२ रोजी (छोटा पॅकेट बडा धमाका)

वसंतोत्सवाची नांदी महाराष्ट्र मंडळाने दणक्यात साजरी केली.  समितीचे आभार आणि अभिनंदन !!

कार्यक्रमाच्या सुरवातीला झालेलं SMS Service Launching … काबिल – ए – तारीफ !!

जागतिक महिला दिना निमित्त तमाम महिलांना दिलेली दृकश्राव्य मानवंदना - अर्चना देशमुखची कविता यथोचित !!

मॅचिंग तडका - सुपरहीट

“छोटा पॅकेट, बडा धमाका” - सुरेख संकल्पना आणि सादरीकरण !! कार्यक्रम झकास !!

रमा कुलकर्णी आणि चैतन्य कुलकर्णी – नव्या गायकांची जबरदस्त गायकी !!

भार्गवी चिरमुले – अदाकारी आणि नृत्य....अफलातून !!

योगेश देशपांडे – स्टेजवरचा अतिशय सहज वावर, भारदस्त आवाज आणि देखणं व्यक्तिमत्व.... श्रोत्यांवर पुरेपूर छाप !!

एकूण.... एक बहारदार कार्यक्रम !!

कार्यक्रमाची वेळ, अल्पोपहार ठेवून जेवण न ठेवण्याचा निर्णय, वेळेत संपलेला कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद !!

एक सुचवावंसं वाटतं – कार्यक्रमाची तारीख ठरवतांना सभासदांच्या सोयीचा विचार व्हावा.  मुलांच्या ऐन वार्षिक परिक्षांच्या मधे हा कार्यक्रम झाल्यामुळे मुलांना आणि काही पालकांना इतक्या छान कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला नाही.

 

अविनाश आणि जयश्री अंबासकर

 


श्री सुरेश वाघमारे ह्यांनी मार्च १०, २०१२ रोजी (छोटा पॅकेट बडा धमाका)

The program was dynamic and very interesting.The concept was excellent and we didn't realize how two hours past.
Best wishes for forthcoming programs.
Congrats to all Organizers. Keep it up.

Suresh Waghmare & Family. 

 


सौ गीता मुळीक ह्यांनी फेब्रुवरी २४, २०१२ रोजी (रांगोळी आणि भरतकाम कार्यशाळा)

महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या छान कार्यशाळेबद्दल हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद . दोघींनी खूप सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले. विशेषतः मला रांगोळीची आवड असल्याने मी घरी आल्या आल्या रांगोळी काढूनही बघितली आणि जमालीही छान, त्याबद्दल सौ अर्चनाचे विशेष आभार. मंडळ अश्या उपक्रमातून आपल्यातीलच काही दडलेल्या कलाकारांना पुढे येऊन आपली कला सादर करण्याची संधी नी सभाधारीष्ट्या देते हे खरेच वाख्नाण्याजोगे आहे.

 


सौ जयश्री अंबासकर ह्यांनी फेब्रुवरी २२, २०१२ रोजी (रांगोळी आणि भरतकाम कार्यशाळा)

आज महाराष्ट्र मंडळाने अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला.  इतका कल्पक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कमिटीचे मनापासून आभार.

भरतकाम – अपर्णा जोशीनं तिच्या कलाकुसरीनं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. तिने केलेल्या भरतकामाचे जे नमुने तिने लावले होते ते बघून तिच्यातल्या कलाकाराचं खूपच कौतुक वाटलं. कलाकुसरीतली तिची सफाई वाखाणण्यालायक होती. तिने दाखवलेलं प्रात्यक्षिक सुद्धा उत्कृष्ठ होतं.

रांगोळी – अर्चना पुराणिक ने तर तिच्या रांगोळीतल्या कौशल्याने अक्षरश: वेड लावलं.  तिची कलाकारी, तिच्या बोटातली जादू आम्ही सगळे थक्क होऊन बघत होतो.  एकेक आकार तिच्या हातातल्या रांगोळीतून साकारत होते.  अतिशय सहजतेने तिच्या हातातली रांगोळी झरझरत होती आणि बघता बघता वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइन्स तयार होत होते.  तिने काढलेल्या रांगोळ्या, गालीचे बघून डोळ्यांचं पारणं फिटलं.

दोघींच्याही कौशल्याला मानाचा मुजरा !!!!!!!!!! 

 


सौ. संगीता संतोष खरात ह्यांनी जानेवारी ३०, २०१२ रोजी (खेळ मांडीयेला वाळवंटी)

वाळवंटातल्या सहलीची कल्पना फारच सुरेख होती. बऱ्याच दिवसानंतर पतंग उडवायला मिळाली. खेळ मजेशीर होते. जेवण उत्तम होते. नवीन समिती सभासदांचे अभिनंदन व आभार.

 


श्री. मधुसूदन मुळीक ह्यांनी जानेवारी २९, २०१२ रोजी (खेळ मांडीयेला वाळवंटी)

महाराष्ट्र मंडळ कुवैतच्या कार्यकारी समितीने छान सहल आयोजित केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. खेळही उत्तम झाले आणि भोजनही उत्तम होते. हौसी आणि प्रश्न्मान्जुशेने अजून मजा आणली. सगळ्या सदस्यांनी मेहेनत घेतलेली जाणवत होती.

सर्व खेळातील आणि पतंग स्पर्धेतील विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

ह्या समितीसाठी आणि येणाऱ्या पुढील समित्यांसाठी एक अनुभव देऊ इच्छितो, ह्यात कोणालाही वैयक्तिक दोष द्यैचा नसून आपणच आपल्यात सुधारणा करण्यासाठी माझे मत.

  1. परीक्षकानैवजी सदस्यांच्या मतमोजणीने निकाल लावावा.
  2. ह्या पुढे कुठलीही स्पर्धा घेताना एक निकष जरूर असावा कि "महाराष्ट्र मंडळानेआधी घेतलेल्यास्पर्धेतीलसामुग्रीपुन्हादेऊ नये " हे अश्या साठी कि ह्या स्पर्धेतील दोन पतंग ह्या , महाराष्ट्र मंडळाच्या २००८ साली घेण्यात आलेल्या स्पर्धेतल्याच होत्या.

आपण सगळे ह्या पुढे स्पर्धा खेळीमेळीने (म्हणजे नवीन स्पर्धा, नवी प्रवेशिका ) घेऊ आणि निकालही योग्य प्रकाराने लावू अशी अशा आहे.

पुन्हा एकदा : ह्या सगळ्या मागे कोणालाही वैयक्तिकरित्या दोषी धरण्याचा हेतू अजिबात नाही.

धन्यवाद

 


श्री  अविनाश अंबासकर ह्यांनी जानेवारी २९, २०१२ रोजी (खेळ मांडीयेला वाळवंटी)

MMK Picnic

At the outset I would like to congratulate MMK 2012 committee wholeheartedly for arranging such a nice picnic. Enjoyed the games & food. The choice of location ( Al-Mulla Spring Camp) need special mention as that was not only fantastic but also gave us a unique Kuwaiti style spring camp experience. MMK 2012 committee is perfect blend of creative old stalwarts and exuberant youth and we are all expecting more innovative programs in coming year. Wishing MMK 2012 Committee all the best for your future programs.
Avinash Ambaskar  

श्री  किशोर खनके ह्यांनी जानेवारी २९, २०१२ रोजी (खेळ मांडीयेला वाळवंटी)

Well begun is half done!! :

Well begun is half done !! The first program of MMK EC 2012 “खेळ मांडीयेला वाळवंटी “ was nicely researched, planned and executed event .

Congratulations to the whole EC 2012.

 

श्रीमती सुषमा ह्यांनी जानेवारी २८, २०१२ रोजी (खेळ मांडीयेला वाळवंटी)

Sahal Nighali Valvanti :

We thanks committee for such wonderful picnic.best venue, apratima breakfast and lunch. All games we enjoyed.
All the best.keep it up.

 


सौ जयश्री अंबासकर ह्यांनी जानेवारी १४, २०१२ रोजी (नवीन समिती अभिवादन)

नव्या समितीची नवी सुरवात एकदम खुसखुशीत !!

शब्दांकन, कल्पकता ह्याचा सुरेख मेळ !!
नव्या उत्साहाच्या ताजेपणाला कल्पकतेची जोड म्हणजे दुग्धशर्करायोग !!
तुमचा उत्साह असाच टिकून राहो !!
खूप खूप शुभेच्छा !!

 


श्री. किशोर व सौ नंदा खनके ह्यांनी जानेवारी १४, २०१२ रोजी (नवीन समिती अभिवादन)

MMK-EC2012 !!..Very thoughtful e-mail –It seems the innovation has begun with the timing of introductory message to MMK members and introduction of EC. With so many highly experienced members , we are sure the year 2012 will be a pinnacle year in the history of MMK.

We wish the entire EC 2012 Team a very great year ahead.

Kishor & Nanda Khanke

 


By Ajay Bhange on 22nd December 2011 (Annual Programme)

Thanks for MMK Committee members, for giving such Wonderful Programmes throughout Year 2011. This Year could be a Bench Mark for coming years .


I thank Mr. Prasanna Deosthalee, for his encouragement for my daughter pooja’s dance. Unfortunately during the dance ,due to lack of precaution fire blown more than what we expected from MUD POT , my Wife regretted the incidence and has apologized to the Cultural Secretary about the same and requested her to inform MMK committee.

And since 1993, we are member of MMK , and had major contribution to bring MMK at this heights .By one incidence, it cannot conclude be, we don’t have social responsibility.

Warm Regards.
Ajay D. Bhange.

 


By Bharti Ajay Bhange on 20th December 2011. (Annual Day)

Dear Webmaster.

Thanks for your mail to our members , due to that we got our lost Ear Ring . It is was with Mrs.Monika Bardapurker ( Abu Halifa ).Thanks to Mrs.Monika also.

Thanks and Regards.

Mrs. Bharti Ajay Bhange.

 


By Mugdha Sarnaik on 19th December 2011 ( Annual Programme)

Dear MMKW Committee,

The MMKW Annual Day was very well organised and very well conducted by committee. I personally missed the MMKW members Natak in second half. As one of the co-ordinators of dance events I fully enjoyed my participation in MMKW Annual Day and I thank you for all the support, encouragement and  appreciation.


Unfortunately I regret to advise that I have some negative feedback to be conveyed. Please note that my negative feedback is not at all against the committee but against one of the dance event that was performed on stage without social responsibilty from which there is learning to be carried forward.


As regards my three dances --."Apsara Aali" performance met the expected quality standard. However my other two dances Gauri Mandavakhali and Kombadi Palali failed to achieve the expected quality standard on the Final day due to following unexpected reasons. Please note that the expected quality standard was witnessed consistently before in daily practice sessions as well as at the stage rehersal.

In the dance event of Gondhal of Ladies..there was lot of Haldi spread on stage due to which the stage became slippery. The subsequent dance participents had to dance carefully due to which they lost their focus and energy level. One participent Ankit Namjoshi almost slipped while dancing and it was a near miss. Anyone else of nervous mentality would have given up dancing at that moment but he being a good dancer covered up to best of his ability. Leave aside the dance but who would have been responsible if he had fallen and faced any physical injury???


Another reason is..When it was clearly communicated by committee to all co-ordinators that they should assign their individual person for backdrop fixing why this was not followed by all co-ordinators. My two dance participents Mr. Piyush Deodhar and Mr. Manish Ambekar who are committee members had to put backdrops for almost all dances which had backdrops. Due to this they got tired and their dance performance was affected due to low energy level. Had they known this before we could have planned / requested for more help.


'Geleli Vel kadhi parat Yet nahi' and hence no apologies are expected. But still this feedback is required to be given as we always move on with learnings. There may be many new co-ordinators coming forward in future and its very important that certain code of conduct / social responsibility is followed by everyone. In pursuit of Quality / Reality of own dance events, the hidden "Surprises" should not come as "Shocks" and hamper quality of other dances. Hope this would be taken into account for next year Events.


Best Regards

Mrs. Mugdha Sarnaik

 

By Sunil Vipat on 18th December 2011. (Annual Day)

Year 2011 Committee!! Great job done, through out the year. You have raised the bar for next committee, which we are sure will be further raised by cooperation of all members.

I am sure you guys must have enjoyed the committee, which could be seen through your programs and presentations.

Annual program was also a great success. Local artists specially the little ones brought lots of joy and entertainment to the audience. At such a small age also their dancing skills, coordination was excellent.

Thanks to you all for giving us wonderful year of events!!

Sunil & Jolly

 


By Shruti Hajarnis on18th December 2011 ( Annual Day)

कार्यकारी समिती २०११,

सर्व प्रथम कार्यकारी समिती २०११ चे आभार आणि अभिनंदन . वार्षिक संमेलनाचा कार्यक्रम  अगदी उत्कृष्टपणे समिती कडून सादर केला गेला. कार्यक्रम चांगला होण्यासाठी कमिटी ने घेतलेले कष्ट जाणवत होते. श्री मनीष आंबेकर, श्री पियुष देवधर ह्यांचे विशेष आभार ह्यासाठी की त्यांच्यामुळेच आमच्या dance चे backdrop लावले गेले.

सकाळच्या  नाश्त्या पासून ते संध्याकाळच्या  चहापाना पर्यंतच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आयोजित केल्या गेल्या.


choreographer म्हणून केलेल्या माझ्या कौतुका बद्दल आभार .


श्री गुप्ता ह्यांच्या  कडून पुढील वर्षाच्या १० आणि १२ च्या मुलांना जी बक्षिसा साठी  sponsorship मिळाली त्यामुळे आनंद झाला.


पण काही गोष्टी खटकल्या त्या नमुद कराव्याशा वाटतात. ह्या मागे तक्रार करण्याचा हेतू  नसून ह्या बाबी पुढे लक्षात घेतल्या जातील अशी आशा करते.  बायकांच्या dance मध्ये जो कापूर  पेटवण्यात आला ते बरोबर वाटले नाही. कापूर पेटवण्यामुळे जर काही आपत्ती दायक परिस्थिती निर्माण झाली असती तर सगळ्याना त्याचा त्रास  सहन करावा लागला असता . आणि कमिटी ही परिस्थिती कशी हाताळणार होते ? तसेच त्यांच्या dance मध्ये प्रमाणा पेक्षा जास्त अशी हळद उडवली गेली . त्यामुळे तिथे नंतरच्या dance साठी उभे राहणाऱ्याना ठसके लागत होते. हळदी चा वास तिथे सगळीकडे पसरला होता. त्याच्या dance नंतर गौरी मांडवा खाली हा dance  होता. त्यासाठी आधी भूपेश, शिल्पा आणि  निरंजन ह्यांना तिथल्या तिथे stage  वरची  हळद झाडायला लागली.  ह्या dance  मध्ये मधुरा सांभाळून नाचत होती हे जाणवत होते.   अंकित नामजोशी हा कोंबडी पळाली  dance करता करता हळदी वरून सटकून पडता पडता वाचला. त्यमुळे कुठे तरी dance ला गालबोट लागले गेले . ह्या गोष्टी टाळता आल्या असत्या .  आणि दुसर म्हणजे काल जेवण आणि खासकरून पाणी कमी पडले. जेवणा  नंतर पाणी प्यायला मिळाले नाही.

परत एकदा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल आणि सहकार्या बद्दल मन:पूर्वक  आभार.
धन्यवाद
सौ श्रुति हजरनीस  

By Bhushan Oke on 17th December 2011 (Annual Programme)

The 2011 Annual MMK program was simply great. I really did not expect the quality of inhouse program to be so good. So much talent was on display and god knows how much more is waiting to be unearthed. "Apsaraa Alli" was a performance par excellence and evoked spontaneous applause. The dance, the steps, the poise, the support from co-dancers and offcourse the Laavni combined to produce a truly superb performance. In quality it was more than professional. All the dance numbers had appealing themes and were well executed.

The afternoon program was good as expected.

Thanks MMK. Keep it up.

Bhushan Oke

 


By Raghav Sadekar on 17th December 2011 (Annual Programme)

Abhinandan to all MMK committee - Annual Program was a Hit for sure and well organized and managed. A little more time would have added more fun & masti for ONCE MORE crowd calls....

 


By Raghav Sadekar on 17th December 2011 (Annual Programme)

MMK ANNUAL Program - A note to new committee....!!!
Pls. provide one LOCK & CHAIN to ensure my front row CHAIRS are not taken when i go out for Lunch break in the program event - dont want to rush lunch and run back...... Till now, it is first come first serve basis......!!!!
For a good seat in front row - Har Ek Friend Jarouri Hota Haii...

 


By Prasanna Deosthalee on 17th December 2011 (Annual Day)

Performance of the Day :

1. Pooja Bhange : Pooja you have wonderful talents. you are good dancer and and what I like most in your dance is facial expression .keep it up . 

2. Team Apsara : Mugdha sarnaike / Shilpa excellent performance. Congrats to your team Ritu,  Akshay, Bhupesh and Dr. Niranjan .... great performance . 

And last but not the least Gondhal from Abu Halifa Team * sorry dont know everybodys name but group dance was excellent with great synchronization

 


By Gauri Altekar on 9th December 2011 (Regarding Raffle n Charity)

खूपच सुंदर Initiative आहे.  मंडळाला आमच्याकडून All The Best !!
आशा करते की तुम्हाला खूप प्रतिसाद मिळेल.  एवढ्या छान कार्याला आमचा थोडा हातभार लागतोय त्यासाठी धन्यवाद !!

 


By Mukul Bhagwat on 7th December 2011 (Regarding Raffle n Charity)

Good move , really appriciate.

Regards.
 

By Vilas Suratkar on 19th November 2011

Nice announcement presentation.

Vilas
 
 

By Prasanna Deosthali on 19th November 2011

Good to hear MMK celebrating Annual Day programme but sad and surprised to know that for this annual day programme MMK is planning to bring outsiders to perfrome..why there is no local talents available ???

 


By Smita Kale on 15th October 2011

काल चा दांडिया कार्यक्रम म्हणजे मंडळाच्या कार्यकारीणीला  अजून एक मानाचा  तुरा.

वेळेत  कार्यक्रम  सुरु करणे ही तर शिस्त  ह्या  कमिटी  ने आपल्या  सगळ्यांना  लावलीच आहे आणि वेळोवेळी आपले कलागुण  सादर  करण्याची  संधी ही वारंवार मिळवून दिली आहे. काल ची सुरुवात  सुरेल गाण्यांनी  झाली.  सगळ्यांनीच  अतिशय  सुरेल गाणी गाऊन मस्त वातावरण  निर्मिती केली. शेवटच्या  कस्तुरी च्या  गाण्याने 'once more'  मिळवून तर सगळ्यांना  नाचासाठी थिरकायला लावले.  लगेचच DJ कलाकारांनी   मस्त मस्त  ठेकेदार  गाणी सुरु केली  आणि सगळेच मनमुराद  नाचू  लागले. चाणाक्ष परीक्षक सगळ्यांमधे  फिरुन best costume, best dancer सगळ्या गटात पहात होते. मधे 2 min break घेऊन  ही सगळी पारितोषिके दिली..सगळे एकदम खुशखुश....परत नाचायला मोकळे.   Desi Treat च्या  स्टॉल ने आणि केशरी  दुधाने  सगळे एकदम संतुष्ट  झाले.

कालची  संध्याकाळ अजून  एक अविस्मरणीय  संध्याकाळ... !

कमिटी  चे   खूप खूप  आभार आणि  कौतुक...... !!

 


By Archana Deshmukh on 19th September

खरे तर आबाल वृद्ध
झाले होते सारेच बद्ध
पाश नव्हता हा परवशतेचा
निखळ आनंद व उल्हासाचा

 

गोजिरवाणी सारीच चिमुकली
वेशभूषा त्यांची आगळी वेगळी
सर्जनशीलता लागली पणाला
भाव खाऊन गेला सब्जी, भंगारवाला

 

French Fries संगे झुलला
डुलला वाढदिवसाचा केक
भटजी, PM, भारतमाता
सारेच एकापेक्षा एक

 

नंतर उगवले सारे तारका व तारे
लखलख तेजाने झळकले सारे
नृत्यांगना अशा तळपती सौदामिनी
भ्रष्टाचारावर करते मात झाशीची राणी

 

रसिकांठायी रुजू झाला
वादनकौशल्याचा नजराणा
अप्रतिम छेडला सर्वांनी
सुरेल सुरावटींचा तराणा

 

सुगरणींनी तर जणू काही घेतली
परीक्षकांच्या रसनेची सत्वपरीक्षा
चविष्टपणाच्या मोहजाळी
लांबली निर्णायाची प्रतिक्षा

 

पोटपूजेनंतर कंठ फुटला पुरुषांना
वाचा फुटली त्यांच्या व्यथा, वेदनांना
ओसामा बिन लादेनचे पैलू झाले प्रकाशमान
पण "बायकोनेच" मिळवला पट्टराणीचा मान

 

कळसाध्यायी अंतिमत: होती अंताक्षरी
किमयागार होती छोटी कस्तुरी
सुसूत्रतेने गुंफला हिंदी मराठीचा मेळ
प्रेक्षकांनीही enjoy केला हा अंताक्षरीचा खेळ

 

कार्यकारिणी समितीच्या संयोजकांनी
सहजी पेलले हे शिवधनुष्य
महाराष्ट्र मंडळाचे खुलले सप्तरंगांनी
Family Day चे इंद्रधनुष्य

 


By Smita Kale on 18th September 2011

 

शुक्रवार १६ सप्टेंबर २०११ चा दिवस मंडळाने दणाणून सोडला.

Family Day ची कल्पनाच एकदम झकास होती.

कार्यक्रम अगदी वेळेवर सुरु झाला  हे ह्या कमिटी ने अगदी कटाक्षाने पाळले आहे ह्याची इथे नोंद करावीशी वाटते. Family Day  म्हणजे काय हे अगदी मस्त पैकी समजावून दिले.

नंतर लहान मुलाचे कार्यक्रम - Fancy  Dress  झाला. काय सुंदर सुंदर तयार होऊन आले होती पिल्ले. खूप मस्त दिसत होती . काही पिलं  बोलायचं विसरली, काही पिलांनी  एकदम उत्साहात सगळं पाठ करून घेतलेलं म्हटलं, काही जणांनी  तर आमच्या कडून पण म्हणून घेतलं. काय सुंदर नजारा होता.  मुख्य म्हणजे ह्या सगळ्याना लगेच बक्षिसं देण्यात आली. काय खुश मंडळी. ह्यात आई बाबांचं पण खूप खूप कौतुक !!

त्यानंतर जरा मोठ्या मुलांचे विविध गुण दर्शन झाले. काय अफलातून करतात मुली- मुले. अगदी professionals च्या तोडीस तोड होते एक एक presentation . परीक्षकांचीच  खरी कसोटी असणार ह्यात शंकाच नाही.

एकीकडे सगळ्या सुगरणींनी केले पदार्थ मांडले होते. काय सुंदर मांडणी, वेगवगळ्या  कल्पना आणि चव पण...! परीक्षक नक्कीच गोंधळून  गेले असणार.   ह्यात खूप आनंदाचा भाग म्हणजे ३ आजींनी पण भाग घेतला होता आणि कमिटी  ने त्यांना पण वेगळा पुरस्कार दिला.  काय विचार करून सगळा प्लान केला असेल.... खरंच कमाल आहे ह्या कमिटी सदस्याची.

आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरुषांना पण नाही हो विसरले. त्यांना पण बोलण्याची संधी दिली. काय मस्त मस्त विषय ..बायको बायको बायको.. इतर पण विषय मस्त होते. खूप जणांनी आपल्या व्यथा ( गंमतीने हो ) कौतुक अगदी झकास मांडले.

पूर्ण कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू म्हणजे अंताक्षरी ---- अतिशय उत्तम रीतीने , कोणताही वाद होणार नाह्ही ह्याची कटाक्षाने घेतलेली  काळजी, त्यासाठी लागणारे software तयार करणे,  ह्यात खनके  कुटुंब भिडले होते.  कौतुक करायला इथे शब्द अपुरे आहेत.

बरेच वर्षापासून लहान मुलाना सोलो  कार्यक्रम करता यावा अशी मागणी होती, ते ह्या कमिटी ने करून दाखवले. लहान-थोर, अबाल-वृद्ध, आजी आजोबा सगळ्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेतले.  शिवाय प्रेक्षकांना  पण सहभागी करून बक्षीसं  दिली ..अजून काय हवे ?  शिवाय चतुर्थी चा मेनू, साधा मेनू चंगळ होती एकदम. 

सगळ्यांनी कार्यक्रमात खूप खूप धम्माल केली. कमिटी चे खूप खूप कौतुक आणि आभार.

काही सूचना आहेत,  अगदी साध्या,  आपण सगळ्यांनी मिळून त्या पाळाव्यात अशी अपेक्षा आहे.

--   हॉल मध्ये खाऊ नये आणि काही वयस्कर किवा लहान मुलांनी खाल्ले तरीही तिथे कचरा होणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी. कार्यक्रम संपल्या नंतर हॉल मध्ये पडलेला कचरा पाहून लाज वाटली.

--   खाऊन किंवा पिऊन झाल्यावर Dish, चमचे, कप इ. इ. फक्त कचर्‍याच्या पिशवीतच टाकावेत. पिशवी भरली असेल तर थोडे बाजूला पहिले तर अजून एका पिशवीची  सोय असते. फक्त जरा दोन पावले लांब जाऊन टाकावे लागते इतकंच . पण ते करण्याची अपेक्षा नक्कीच असते.

 

आपण स्वतःला सुशिक्षित म्हणवतो ना .. मग इतके तरी करायला हवे.... 

 


By Mugdha Sarnaik on 17th September 2011

Dear MMKW Committee,

Many Thanks and Congrats for organising wonderful event of Family Day. The event gave opportunity to all age groups of members to participate in different competitions. Members' guests were also given an opportunity to participate in competitions and above all you made them feel special for their active participation. Many thanks for that.

I personally loved participating in Recipee contest and Antakshari. Antakshari was very well organised and conducted. The efforts taken to conduct Antakshari were really commendable. Seeing the members huge response and knowledge:) now on Hindi Film music can also be incorparted in MMKW future programs alongwith Apli Marathi.

Your tremendous efforts supported by active participation of members in large number have made the Event a grand success.

 

Hats Off to MMKW!!!

 


By Jayant Pandit on 17th September 2011

'पाहुणे' म्हणून महाराष्ट्र मंडळ कुवेतच्या कौटुंबिक दिनाला उपस्थित राहण्याची आणि आयोजित स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी दिल्याबद्दल मंडळाच्या कमिटीचे शतशः आभार. परदेशात राहूनही मराठी अस्मिता जपण्याचे आपण करीत असलेले काम पाहून खूप आनंद झाला. सर्व कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मंडळाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो यासाठी आम्हा दोघांच्याही हार्दिक शुभेच्छा.

सौ. विनिता आणि श्री. जयंत पंडित

(श्री. गौतम सरनाईक याचे सासू सासरे) 

 


By Dileep Sawant on 17th September 2011

 

काल 'कुटुंब दिन' यशस्वीरीत्या पार पडला.
आम्ही सर्वांनी कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला.
समितीच्या सदस्यांनी घेतलेल्या अतीव श्रमाची एक साधारण सभासद म्हणून मला कल्पना आहे.
आपणा सर्वांचे आभार आणि अभिनंदन करण्यासाठी हा ईमेल प्रपंच.

वेलडन !

 

- दिलीप सावंत 

 


By Rahul and Archana Gokhale on 16th September 2011

We enjoyed today's MMK family day. I am sure your team would have put lot of efforts in putting together this programme. All of you deserve pat on back. By organizing various different contests you gave opportunity to number of our people to demonstrate their skills. Antakshari was great example where almost 70 people participated. I am sure such large participation will contribute towards growth our MMK.  Wish you and your team good luck for the rest of the year.


Though going forward we won't be part of MMK, our good wishes are always with MMK.

 


By Santosh and Sangita Kharat on 16th September 2011

आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला...विशेषतः अंताक्षरी साठी खनके कुटुंबीयांनी घेतलेली मेहनत अप्रतिम...तसेच सौ जयश्री अंबासकर ह्यांचे सुंदर सूत्र संचालन...मंडळाच्या बाकी members चे सुद्धा हार्दिक अभिनंदन.

 


By Suresh Waghmare on 16th September 2011

One of the best program i have seen during last four years.

Keep it up & our best wishes.


Suresh waghmare & Family

 


By Ajay Vibhute on 6th June 2011

Dear Committee members 2011,

First of all sincere thanks and loud appreciation for organising excellent program on Maharashtra day celebration in Kuwait to all of you and those who helped direly or indirectly and attendees. It was combination of hard work, excellent efforts with commitment and well-coordinated event by all. 
Team selection was very good and all team members performed fabulously to meet the desired intent. Appreciate your efforts in stage decoration, selection of the hall and food arrangements. 
Over all it was excellent effort and I hope everybody enjoyed it to the fullest. t was a grand success.
I am sure that MMK will continue giving similar events with greater success and satisfaction for the Marathi communities.

We are proud of you. Keep it up. 

 


By Satej Rajeshirke on 20th May 2011

प्रिय महाराष्ट्र मंडळ,

धन्यवाद धन्यवाद धन्यवाद !!!

मी आणि माझा परिवार तुमचे मनापासून ऋणी आहोत.

तुमच्या त्यागाला, दिलेल्या वेळेला आणि परिश्रमाला आमचा सर्वांचा सलाम.

तुमच्या कडून अजून मोठे, बहारदार आणि झकास कार्यक्रम होवोत हीच हक्काची मागणी.

आपला ऋणी,

सतेज राजेशिर्के आणि परिवार

 


By Smita Kale on 19th May 2011

मंड्ळी, 

अभिप्राय देण्यास उशिर होत आहे.....त्यामुळे इतकंच लिहीन की .. खूप खूप सुरेख कार्यक्रम झाला......कमिटी सदस्यांचे मनापासून अभिनंदन..... !!
आप आगे बढो ..हम आपके साथ है..... !! 

 


By Suresh Waghmare on 16th May 2011

Dear Committee members 2011,
Congratulations for organising Maharashtra day program in Kuwait. It was an excellent coordinated event, enjoyed songs and members dance also. The stage decoration’ was very good & our children’s enjoyed the new place. It was a grand success.
Our best wishes to Organizing committee and we look forward to such great events in nearby.

Suresh Waghmare & family 

 


By Ravindra Dhande on16th May,2011

झकास !!! 

“मन उधाण वार्‍याचे” ह्या कार्यक्रमाचे एकाच शब्दात वर्णन करावयाचे झाल्यास झकास शिवाय दुसरा शब्दच सुचत नाही. हा कार्यक्रम बघितल्या नंतर असा बहारदार कार्यक्रम बर्‍याच वर्षानंतर बघितल्याची जाणीव झाली. त्यात प्रामुख्याने नमूद करावेसे वाटते ते मंडळाच्या कमिटी सदस्यांनी घेतलेले अथक परीश्रम. त्यांनी घेतलेल्या परीश्रमाची झलक अगदी छोट्या छोट्या गोष्टीतूनही निदर्शनास येत होते.

हा कार्यक्रम करणारया चमूने आधी एकत्रित अशा एकाही कार्यक्रमाचे आयोजन केलेले नव्हते आणि या सार्‍यांना जुळवून आणून असा अप्रतिम कार्यक्रम करवून घेणे, हे खूपच कठीण काम असूनही मंडळाच्या कमिटी सदस्यांनी अगदी लीलया पार पाडले. त्या बद्दल त्यांचे कौतुक करावे तेव्हडे थोडे.

कार्यक्रमाचे अभिवादन गीत आणि व्यासपीठ सजावट या सर्वानी तर कार्यक्रमास अजूनच बहर आला. पुढच्या कार्यक्रमा साठी हा कार्यक्रम मात्र आता एक प्रमाणच झाले आहे आणि आम्हा सर्वांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत.

उत्तरोत्तर मंडळाची अशीच प्रगती होत राहो हीच शुभेच्छा.

 


By Dr. Hemant & Dr. Mrs Ujjawala Kshirsagar on 16th May,2011

Excellent porgramme! Compliments to organizing committee. Special compliments to Mrs. Rane for "Stage Decoration" and Mrs. Khanke for theme song. The "Mavlas" were aptly dressed with "Pagote, Talwari and Myaan", "Tutari". Compliments for very innovative ideas. This makes youngsters involved in " Marathi Sanskruati". No doubt Guest artists performed very well, none the less compliments to all who worked day and night for the success of the event. Wishing all the very best for future events!

 


By Aniruddha Joshi on 15th May,2011

नमस्कार...मुद्दाम मराठीत मेल करतोय. मी आज सकाळी पुण्यात पोचलो.

२-३ दिवस कसे गेले खरंच कळलंच नाही.  खूप मजा आली तुमच्या सगळ्यांबरोबर.  कार्यक्रम तर तुम्ही खूपच छान organise केला होता.  Stage Decoration पासून तर तुमच्या वेशभूषेपर्यंत मराठी मातीचं प्रेम दिसत होतं आणि तुमच्या Dance नी तर फारच धमाल आली.  तुमचा सगळा ग्रुप खरंच मस्त आहे.  हे २-३ दिवस नेहेमी स्मरणात राहतील.

आणखी काही वेगळे theme based events कधी करणार असाल तर मला  नक्की संपर्क करा...

M- +91-9890889385 धन्यवाद,

Website - www.aniruddhajoshi.com अनिरुद्ध जोशी

 


By Anant Ashtikar on 15th May,2011

Dear MMK Leaders (Exe. Com. 2011),

Thank you very much, for the Grand celebration event of "Maharashtra Day", and kindly accept our "Heartiest Congratulations" for the overall management of the evening.

The Hardwork, Dedication you exhibited, to cross all the records in funds generation through MMK Souvenir 2011 sponsorships, are exceptional and example setting.

The Program, Artists, Venue all selection matched the wonderful evening.

With this you have made us to keep waiting eagerly for, What next? And with your team performing so well expect to see more & more. Keep it up.

 

With Best Wishes,

Anant & Dr. Kanchan Ashtikar.

 


By Milind Joglekar on 14th May, 2011

Dear Kumathekar Saheb & other committee members of MMKW,

Hearty congratulations to all of you for the May day programme.

It was really enjoyable !!!!

It was a great success simply because of your meticulous planning and sheer interest for all the Maharashtrians staying in Kuwait.

I wish all of you a great success and a good luck for rest of yor tenure in year 2011.

Once again congratulations to all of you !!!!!

 

With Best Regards,

 

Milind Joglekar and family.

 


By Dattatray Gadre on 14th May,2011

13th May Cha Netradeepak karyakram Yashsvi Pane Ayojit Kelya Baddal Mandalache Aani Jyanni Jyanni HyaSaathi Shram Ghetle Tya - Tya Sarvanche Abhinandan.

Jai Maharashtra

 


By Mugdha Sarnaik on 13th May,2011

Program farch surekh zala. Sagli surel gani khup enjoy keli. Stage decoration ani lahan mulanni kelela dance pan uttam hote. Smita Rane ani Nanda Khankenchi kalpakta khup chan ahe.

Barichshi gani aapalyaa "Sur tech chhedita" madhli hoti. Jayashree, Prasanna ani Pratikne mhatleli (Reshmachya reghani, Ali Thumkat nar lachkat, Ashwini Yena, Man Udhan Varyache) tasech jyavar dance performances zalet (Radha Bawri, Vajle ki bara). MMKW madhe membersni sadar keleli gani professionals kadun aikayla khup cchan vatla. Ani nakalat comparison houn apla "sur tech cchedita" kahi kami navhta asahi vatun gela)

Really Hats off to entire MMKW committe for taking so much of efforts and creativity. Wishing MMKW committe all the best for all future programs.

MMKW Rocks!!

Mugdha

 


By Gauri Altekar on April 27,2011

khara sangayche tar mala ha message takayla jara usheer ch zhala aahe. Pan mandala tarfe jo salad n sandwiches cha karykram zhala na to khoopch chaan zhala. mazhe tya divshi shikavlele sagle padarth banvun zhale aani gammat mahnje chaan jamle hote. Sorry ha tumhala bolvavle nahi karan evdha confidence navhta.


Mazhya sarkhya svaipakat limited scope asnarya gruhininsaathi ha karyakarm khoopch prerna dayak hota. Pudhe ase recepie exchange program hotil ashi asha balagte..


By Mrinal Mukul Bhagwat on April 11, 2011

कालचा कार्यक्रम खूपच छान झाला .....खूपच सहज पद्धतीने केक शिकवला salad तर गमती जमती करत शिकलो ......नवीन नवीन टिप्स मिळाल्या ...मी तर लगेच आज स्वीट आणि salad घरी केलं आणि छान सुद्धा झालं.....शिकवलंच छान तर होणार का नाही छान?......... मृणालिनी आणि वंदनाला खूप खूप धन्यवाद !! कमेटीचेही खूप खूप धन्यवाद....... त्यांनी असेच कार्यक्रम करत राहावे.

 


 By Smita Kale on April 11, 2011

काल एक अगळा वेगळा अनुभव आणि प्रात्यक्षिक अनुभवले.....अतिशय सोप्या प्रकारे किती छान आपण केक बनवु शकतो.....सॅलड साठीच्या सहज सोप्या युक्त्या ...काय लक्षात ठेवावे...हे अगदी शास्त्रज्ञाच्या मते काय आहे... Kitchen chemistry cha fundaa.....अगदी मस्त पैकी मज्जा करत शिकलो...हसत खेळत गप्पा मारत पट्कन sandwiches बनवली.....आणि सगळ्यात महत्वाचे की...ह्या सगळ्याची नुसती चवच नाही तर पोट भर चव अनुभवली......नीलिमा ...जयु...नंदा...प्रज्ञा...मधुरा....(चुकून कोणाचा उल्लेख करयचा राहिला असल्यास राग मानु नये)...आणि सगळ्या कमिटी चे खूप खूप कौतुक......असेच मस्त मस्त उपक्रम पुढे सुरु राहतीलच... आमच्या सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा !

 


By Madhusudan Mulik on March 30, 2011

Congratulations to all committee members for arranging a nice memorable picnic for Children. 

 


By Smita Kale on March 28, 2011

Kuwait Censusis going on now. We can register ourselves online . This will avoid any one knocking at door and causing unwanted issues. So please register online at following website . It is very easy and will take not more than two min .

http://kuwaitcensus.com/index_en.html

 


By Chandrashekhar Misal on 20 March 2011

पिकनिक खूपच छान झाली !!! सगळ्यांनी खूप खूप  मज्जा केली !! एकदम मनमुराद आनंद लुटला !! पहिल्यांदाच आमची मंडळासोबत  पिकनिक होती  आणि  माझ्यासाठी अन् कुटुंबियांसाठी अविस्मरणीय ठरावी अशी झाली !!   मंडळाच्या  सर्व  कार्यकारिणी समितीला सलाम आणि धन्यवाद !!!.

पुन्हा सर्वांना...... होळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

चंद्रशेखर मिसाळ आणि कुटुंबीय

 


By Smita Kale on March 19, 2011

कालची सहल अतिशय उत्तम रितीने प्लान केली होती. आधीपासून तारीख ठरवून सगळ्यांना सहभागी करुन घेण्याची कल्पना एक्दम मस्त .. ! बाग अतिशय मस्त होती. सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम खूप छान आखला होता.. !! थोडक्यात, आपल्या होळीचा आनद लुटला... !! खेळ अतिशय कल्पक होते... ! जेवणाची चव अजून जीभेवर रेंगाळत आहे..... !!  शेवटी बिंगो..... आणि नविन नविन आश्चर्यचकित करणारे खेळ घेऊन सगळ्यांना खूप खूप धम्म्माल आणली... !!

Three cheers for MMK commitee .. hip hip hurrye , hip hip hurrye !!

 


By Rahul Gokhale on March 18, 2011

We had great  picnic today. I am sure every body would have enjoyed it like us. The games were really different and enjoyable. We had to leave  bit early in evening  so could not personally thank committee members. Please convey to them. Wish you good luck for next programme !!

 


By Smita Kale on February 13, 2011

आपल्या मंडळाचे इतके सुंदर अस्मिता गीत आपल्याच कलाकारानी लिहिले आहे, स्वरबद्ध केले आहे ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. जसे शाळेत प्रत्येक शाळेचे गाणे रोज गायले जाते त्याच धरतीवर आपले हे मंडळाचे अस्मिता गीत प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी म्हणावे किवा ऐकवावे ....ही सूचना सर्व प्रथम पल्लवी खराडे ची आहे. त्याला माझा मनापासून दुजोरा आहे. कार्यकारी समितीने ह्याचा जरुर जरुर विचार करावा धन्यवाद...स्मिता काळे.

 


By Deepika Joshi on February 12,2011

महाराष्ट्र मंडळाचा ह्या वर्षाचा पहिला संक्रांती चा कार्यक्रम झाला, त्यावरील अभिप्राय पण झालेत. छान झालेल्या कार्यक्रमांची मनांत घोळवणूक सुरूच असते. वार्षिक कार्यक्रमाची गाजलेली शेवटची लावणी ‘वाजले की बारा’ असो किंवा आत्ता नुकतीच झालेली भीमराव पांचाळे ह्यांची गजल गायनाची मैफिल असो...

प्रत्येक कार्यक्रमात कुठली उणींव राहीली किंवा कुठे सुधारणा हवी असेल तर कार्यकारी मंडळ त्याचा विचार करत असतं. ह्या वर्षीच्या वार्षिक कार्यक्रमात ज्या काही कमतरता होत्या त्याची चर्चा अजून सुरू आहे. बाकी कुठलेही वर्षभराच्या कार्यक्रमाचे चांगले वाईट झेलायला चालू कार्यकारी मंडळाला तयार असावंच लागते व त्याचा आढावा घेतला जातोच. मेहनत खूप केलेली असते पण कधी कुठे उणे राहिले तरी काळजी नाही. मंडळ आपले सगळ्यांचेच आहे असंच मी नेहमी म्हणते. पण.....

महाराष्ट्र मंडळात वार्षिक कार्यक्रमात नवीन कार्यकारी मंडळाच्या स्थापनेची सूचना केली जाते. त्यावेळी किंवा नंतर उत्सुक आणि उत्साही लोक पुढे येतात व नवीन समिती स्थापन होते व कामाला लागते. ह्यात होते असे की वार्षिक कार्यक्रम कसा झाला ह्यावर विचार करायला किंवा त्याचा आढावा घ्यायला कोणतीच समिती नसते. जुनी निघून गेली आणि नवीन चा संबंध नाही. ह्यापेक्षा असे केले तर.... नवीन कार्यकारी मंडळ जानेवारी मधे संक्रांतीच्या कार्यक्रमानंतर स्थापन व्हावे. ह्यात ज्यास्त सोयीचे असे होईल (हे माझे वैयक्तीक मत आहे) की जानेवारी मधे संक्रांती च्या कार्यक्रमानंतर मार्च च्या शेवटी किंवा त्या सुमारास होणारी पिकनिक हा नवीन कार्यकारी मंडळाचा पहिला कार्यक्रम असेल. मधला दीड-दोन महीन्याचा वेळ पिकनिकच्या तयारी साठी पुरेसा नक्कीच आहे. व नंतर वर्षभर जे काय कार्यक्रम विचारात घ्यायचे असतील त्याला भरपूर वेळ मिळेल व कार्यक्रमांचे आयोजन चांगले करता येईल. कारण भारतातून कार्यक्रम आणायचा असेल तर मंडळाच्या सदस्यांना खूपच मेहनत करावी लागते व सगळे जमून यायला वेळ लागतो. हे सगळे अतिशय क्लेशकारी आहे. जसे ह्या वर्षी झाले की १० डिसेंबर ला वार्षिक कार्यक्रम झाला व लगेच नवीन समिती येऊन जानेवारीचा संक्रांती चा कार्यक्रम करणे.. खूपच कठिण. पण कमाल आहे ह्या वर्षीच्या समितीची की अवघ्या १५-२० दिवसांच्या वेळात उत्कृष्ट व दर्जेदार कार्यक्रम देण्यात ते यशस्वी झालेच आहेत. पण ह्याच कार्यक्रमात जेवणामुळे थोडे गालबोट जे लागले ते कार्यकारी मंडळाने एक दिलगिरी ची इमेल पाठवून ‘आम्ही जागरूक आहोत व झाल्या चुकीबद्दल दिलगिरी’ व्यक्त करण्यास काहीच हरकत नव्हती. सदस्यांची मने जिंकण्यास ह्याची मदत होईल.

आणि हे पण आहे की इथे आलेल्या अभिप्रायांची (महाराष्ट्र मंडळाचे जागरुक सभासद आता ब्लॉग मुळे आपापल्या प्रतिक्रिया उत्साहाने देत असतीलच असा विश्वास आहे.) मंडळ दखल घेत आहे हे बाकी सभासदांना समजणे जरूरी आहे (प्रत्येक वेळी बाकी सभासदांनी आपले अभिप्राय किंवा काही सूचना द्यायच्या आणि त्याची दखल घेतली जातेय हे कळायला काहीच मार्ग नसतो असेच होऊ नये.)  थोडक्यात कधी गरज असेल तर ह्या माध्यमाचा उपयोग संवाद साधण्यासाठी किंवा सभासदांना सूचना करण्यासाठी होऊ शकतो.

चालू कार्यकारी मंडळाने ह्यावर जरूर विचार करावा. कसे सगळे नियमांत बसवता येईल हे कार्यकारी मंडळ व बाकी महाराष्ट्र मंडळाच्या सभासदांच्या सहकार्याने शक्य होण्यास काहीच वेळ लागणार नाही अशी खात्री वाटते. आपल्याला काही फेरबदल करून जर सफलतेकडे एकेक पाऊल पुढे टाकण्यास मदत होत असेल तर सोने पे सुहागा.

 


by Bhushan Oke on January 26,11

This is to congratulate you for organizing a fantastic first program of the year. The marathi ghazal program was really very good. All the arrangements and compering by Jayashri was excellent. There was some problem with food quality but that's going to happen sometimes when you are organizing programs on such a grand scale. At times, there are things that are beyond your control. I'm aware how much effort is required by the whole team to organize such events and I  thank you and wish to congratulate you and your team again on successful Organization of this event.

Hope we will get to enjoy many such good programmes this year. 

 


by Deepika Joshi on January 26, 11

२०१० सरले, नव्या कार्यकारी मंडळाच्या सानिध्यात आता काय पर्वणी आहे ह्याची उत्सुकता होतीच. महाराष्ट्र मंडळाची साईट अधिकच सजली. पहिल्या आठवड्यात इमेल द्वारे कळले की २१ जानेवारी ला गजलसम्राट भीमराव पांचाळे येणार. सध्या त्यांची स्तुती करण्यात अख्खा महाराष्ट्र तल्लीन आहे. गेल्या वर्षी थेट अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मंडळात पण त्यांनी आपल्या गजल गायनाने ज्यांची मने जिंकली आहेत त्यांना प्रत्यक्ष गजल गाताना बघायचा व ऐकायचा योग महाराष्ट्र मंडळाने आणला आहे ह्या कल्पनेतच आधी खूप सुखावलो होतो. मंडळाच्या साईटवर लगेच त्यांचा फोटो, त्यांच्याबद्दलचे निरनिराळ्या वर्तमानपत्रातील कौतुक झळकू लागले. कधी एकदा येणार २१ जानेवारी....

दुपारी ४ वाजता बरोबर कार्यक्रम सुरू होणार हे ठरले होते. (Early birds)  लवकर येणारं पाखरू ही स्पर्धा असल्यामुळे बर्‍यापैकी सगळे वेळेवर येणार आणि ठरल्याप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाचा आराखडा न गडबडण्यास ह्याची नक्कीच मदत होणार होती. आल्या आल्या आधी तासभर संक्रांतीचे हळदीकुंकू होते. पारंपारिक वेशभूषेच्या स्पर्धेमुळे अजूनच सगळीकडे नटणे-थटणे दिसत होते. ही स्पर्धी पुरुषांसाठी पण असल्यामुळे त्यांना पण प्रोत्साहन मिळाले आहे हे सगळ्यांकडे बघून कळत होते. छान स्वागत, हळदीकुंकू, सौ. प्रज्ञा ने केलेली चविष्ट तीळगुळाची वडी, आकर्षक आणि उपयोगी वाण.. ह्या वेळी अजून एक वेगळी कल्पना होती ती अशी की जे एकटे पुरुष इथे आहेत त्यांना पण छोटीशी भेटवस्तू (वाण) दिली. मज्जाच होती. गरम गरम चहाचा आस्वाद घेऊन सगळे सभागृहाकडे वळत होते.

मंच कार्यक्रमासाठी तयार होता. संक्रांतीचे प्रतीक असलेले...काळी साडी, हलव्याचे दागिने, तर्‍हे-तर्‍हेचे पतंग.. सगळ्या हॉलभर उडत होते. सजावट एकूणच लोभस आणि प्रसन्न मराठमोळी होती.

कार्यक्रमाला सुरुवात झाली ती जयश्री अंबासकर च्या मधूर लयबद्ध संचालनाने. सर्वप्रथम गणेशवंदना झाली.... अगदी ताला-सुरा-नृत्यावर. नव्या कार्यकारी समितीची ओळख, अध्यक्षांचे छोटे से भाषण झाले. त्यानंतर श्री. भीमराव पांचाळे, तबलावादक डॉ. श्री.देवेंद्र यादव व पेटीवर साथ देणारे श्री  जगदीश मिस्त्री, ह्यांची ओळख करून दिली गेली. श्री. पांचाळे ह्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. तिघेही स्थानापन्न होऊन गजलगायकीला प्रारंभ झाला. गजल गायन हा इथे अगदी नवीनच प्रयोग होता.

गजल हा काव्याचा प्रकार वाचण्यात सगळ्यांच्याच आला असणार पण तरी ही भीमरावांनी गजल थोडी अजून आमच्या जवळची करून दिली आणि सगळ्यांनाच त्यात आवड निर्माण केली. वेगवेगळ्या गजलकारांच्या गजला... भीमरावांचा आवाज... तबला व पेटी ची अप्रतिम साथ...मधे मधे जयश्री चे सुरेल गोड सूत्रसंचालन... अगदी मंत्रमुग्ध झालो. ‘’अंदाज आरशाचा...’’ पासून जी मैफिल मस्त रंगली... ‘’तू चोर पावलांनी...’’, ‘’ख्वाब के जैसे झूठे मेरे यकीं निकले’’.. वा वा... रंगत रंगतच गेली. मराठी व उर्दू(हिंदी) ची सम्मिश्र गजलेने तर कहरच केला. दाद किती मिळावी.....हे सगळे कधी संपूच नये असे वाटत असून ३ तास संपलेतच. अविस्मरणीय अनुभव आहे हा.

बर्‍याच लोकांची इच्छा असणार व ते अनायसे एक दिवस अजून इथे राहणार होते तर रविवारी पुन्हा सुरेल मैफिलीचे आयोजन श्री. दिवेकर ह्यांच्या घरी केले. तिथली रंगत कशी होती हे शब्दात सांगणे कठिण आहे. अगदी समोरासमोर बसून उर्दू गजलांचा आस्वाद घेणे... नशिबानेच घ्यावे लागते म्हणायला हरकत नाही. त्यांनी गजलगायकी मधे केलेले निरनिराळे यशस्वी प्रयोग अफलातून आहेत. गजल गाताना अर्थ कसे कसे बदलू शकतात हे सांगताना हशा पिकवला.

मराठी गजलांमधे सुरेश भटांची... ‘’हा असा चंद्र....’’, संगीता जोशींची... ‘’आयुष्य तेच आहे....’’ अशी यादी तर बरीच मोठी आहे. उर्दू गजलांमधे... ‘’ठंडी हवा के झोंके...’’ वा वा...

सहा सात आणि आठ मात्रांची खेळी कशी हे ‘’तू दिल्या जखमात मी हरवून गेलो...’’ ह्या गजलेत प्रयोग करून केली... तारीफ करत व टाळ्या वाsssssssजवतच राहीलो आम्ही. कमाल आहे गजलकारांची आणि नंतर भीमराव पांचाळे सारख्या गजलगायकांची... !

त्या सुखद क्षणांतून.. त्या स्वप्नवत वाटणार्‍या गजल गायकीच्या सुरातून बाहेर यावेसेच वाटत नाहीये. अजून तरी त्यातच मशगुल असल्यासारखे वाटतेय.

इतक्या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मंडळाचे प्रचंड धन्यवाद व आभार.

२१ तारखेला चविष्ट तीळगुळ, गजल कार्यक्रमाची गोडी... सगळे छान झाले होते. पण शेवटी गालबोट लागले ते जेवणाने. ह्यात तसा दोष कोणाचाच नाही. आधी दोन वर्षापूर्वी असेच झाले होते त्यामुळे असे ठरवतांना ते विचारात घेता आले असते. कार्यकारी समिती कुठलीही असो... नेहमीच वर्षभर सगळेच चांगले देण्याचा आटोकाट प्रयत्न करतच असते, खूप मेहनत करते ह्यात शंकाच नाही. समिती बरोबर बाकी सगळ्या सभासदांनी पण समजून घेण्याची गरज आहे. आधी कार्यकारी समिती मधे एकमत व नंतर सभासदांचा सहयोग पण...

३-४ तासांच्या कार्यक्रमात खरे तर जेवण देण्याची गरजच नाही. फक्त चहा व ठेवायचाच असेल तर हल्का नाश्ता. ह्या बाबतीत पण नवीन प्रयोग करता येण्यासारखे आहेत. जेवण दिवसभराच्या दोनच कार्यक्रमात म्हणजे बागेतील सहल व वार्षिक कार्यक्रमाला असले तरी खूप आहे. सगळ्यांचाच उद्देश एकमेकांची एकत्र भेट आणि विशेष कार्यक्रमाची मजा घेणे हाच असेल तर उत्तमच.

सगळ्या सभासदांच्या सहकार्याने पुढचे आपल्या ह्या महाराष्ट्र मंडळ रूपी कुटुंबाचे सम्मेलन उत्कृष्ट होईलच ह्यात शंका नाही.

धन्यवाद. अनेक शुभेच्छा !!

 


by Smita Kale on January 25,11

महाराष्ट्र मंडळाचा संक्रांतीचा कार्यक्रम काय असणार ह्याची उत्सुकता २०१० चा वार्षिक कार्यक्रम संपताच लागली होती. नवीन कार्यकारी मंडळ कोणता कार्यक्रम आणते ह्याकडेच सगळ्यांची नजर असते. प्रत्येक वर्षी एक वेगळे काही तरी कार्यक्रम देण्याचा महाराष्ट्र मंडळाचा प्रयत्न असतो. त्यात थोडी शंका तर असतेच की कोणाला आवडेल, कोणाला नाही, बाकी सदस्यांची काय प्रतिक्रिया येईल वगैरे वगैरे. पण आत्तापर्यंत सर्व कार्यक्रम बघता आपली मंडळी खुप उत्स्फूर्त प्रतिसाद देतात हे मात्र नक्की. त्यामुळे कार्यकारी मंडळाचा उत्साह नेहमीच वाढता आहे.

ह्यावर्षी पण २१ जानेवारी ला असाच एक आगळा-वेगळा कधी न झालेला कार्यक्रम मंडळाने आयोजित केला होता तो म्हणजे भीमराव पांचाळे ह्यांचे गजल गायन. संक्रांतीच्या हळदीकुंकवाच्या निमित्याने विशेष आकर्षण होते पारंपारिक वेशभूषा आणि लवकर येणारे पाखरू  (early bird) स्पर्धा. ह्या घोषणेनंतर सगळीकडे चर्चा, उत्साह, उत्सुकता अशा संमिश्र भावनांचा प्रतिसाद होता.

२० जानेवारी ला सकाळी भीमराव पांचाळे व त्यांचे सहकलाकार ह्यांचे कुवेत मधे आगमन झाले. २१ जानेवारीला ४ वाजता रिगाई च्या एका शाळेत हा कार्यक्रम होता. तिथे पोहोचलो तर वातावरण एकदम मस्तं होते. बरेच जण पारंपारिक वेशभूषेत मिरवत होते. परिक्षक आपल्या बारीक चिकित्सक नजरेने सगळ्यांना न्याहाळत होते. येत्या वर्षाचे शुल्क देणे, लवकर येणारे पाखरू चा नंबर लावणे वगैरे झाल्यावर लगेच तिथे एकट्या असलेल्या पुरुषांना पण वाण दिले. दर वेळेपेक्षा हा एक सुखद अनुभव होता त्या सगळ्यांसाठी आणि कल्पना पण सुरेखच. नंतर बायकांचे हळदीकुंकू. नटलेल्या बायका, प्रज्ञाने केलेली नेहमीप्रमाणेच छान तिळाची वडी, उपयुक्त वाण.. मज्जा आली. सुका मेवा भरून ठेवलेली सुबक बैल गाडी सगळ्यांना आकर्षित करत होती. सभागृहात प्रवेश झाल्या झाल्या रंगमंचाची व बाकी पण सजावट बघून सगळ्यांच्याच तोंडून ‘वा! सुरेख!!’ निघत होते. काळी साडी, हलव्याचे दागिने आणि रंगबिरंगी पतंग लक्ष वेधून घेते होते. वातावरण संक्रांतीला शोभेसे आणि तिळगुळाप्रमाणे गोड होऊन गेले.

कार्यक्रमाची सुरूवात अगदी ठरल्या वेळी तालबद्ध लयबद्ध नृत्यातील गणेशवंदनेने झाली. सुरूवातीपासून शेवटपर्यंत जयश्री ने सूत्र संचालन अतिशय ओघवत्या गोड वाणीमधे केले. कार्यक्रमाची रुपरेषा व थोडक्यात गजल बद्दल सांगितले. नंतर गजलनवाज श्री भीमराव पांचाळे व तबलावादक डॉ. श्री.देवेंद्र यादव व पेटीवर साथ देणारे श्री जगदीश मिस्त्री, ह्यांची ओळख करून दिली. “भीमरावांबद्दल बोलायचं म्हंटलं तर अख्खा दिवस पण कमी पडेल” हे म्हणणे एकदम रास्त होते.

सुरूवात झाली गजलेच्या मैफिलीला... मनाला भिडणार्‍या गजलांनी सगळे भारावून गेले होते. १० मिनिटाच्या मध्यंतरात पारितोषिक वितरण सोहळा झाला व पुन्हा एकदा गजलांमधे सगळे रममाण झालेत. कधी संपूच नाही असे वाटत होते. कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांनी भीमरावांना व त्यांच्या साथीदारांना उभे राहून मानवंदना दिली.

आजच्या कार्यक्रमाची सांगता होताच आनंदाची सूचना आली की रविवारी भीमरावांची एक मैफिल अजून होणार आहे. सोने पे सुहागा....

कार्यक्रम सुरेल व अविस्मरणीय झाला. थोडे बहुत कमी ज्यास्त होतंच असणार, प्रत्येक वेळी सुधारणेची जागा असतेच. काही सूचना किंवा थोडे सुचवावेसे वाटते त्याबद्दल गैरसमज होणार नाही ही खात्री आहे. लहान लहान गोष्टींमधे गडबड होत असते हे सगळ्यांनाच मान्य आहे. शेवटी महाराष्ट्र मंडळ हा आपला परिवार आहे त्यामुळे थोडे उणे-दुणे झाले तरी आपण समजून घेतोच व घ्यायलाच हवे आणि आपले सगळेच कार्यक्रम निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रयत्नशील सगळ्यांनीच असायला हवे. कार्यकारी मंडळाच्या सदस्यांची धावपळ व दमणूक बघता त्यांना आपण पण मदतीचा हात नेहमीच पुढे केला पाहीजे. पण एक मात्र आहे की जेवणासंबंधीत मंडळाने अतिशय दक्ष राहण्याची गरज आहे व आधी झालेल्या चुका पुन्हा घडू नये ह्याकडे लक्ष असू द्यावे.

पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा !

 


by Rahul Gokhale on  January 24,11

Last night I thoroughly enjoyed  Gazal Mehfil (last night only I learnt that Gazal always has Mehfil not the concert ). Its very difficult for me to express my feelings in the words (cannot help I am just an accountant, not poet).   It kind of forced me to change my view about Gazal in very very positive way. I am sure it would have similar impact on many others in yesterday's audience. 

Our Sankrant evening was very well organised.  May be for the first time in my memory, MMK commenced its programme on scheduled time. Hope this trend will continue in future. 

Many thanks to your team  for organising two wonderful evenings. Your team has really raised the bar. Looking forward to see,such high quality programmes through out the year. 

Wish you and your team good luck.

warm regards

 


by Archana Deshmukh on January 23,11

नवं दशक, नवं वर्ष, नवी आहे कमिटी
जोशिल्या जयश्रीच्या उत्साहाला येई भरती

मंडळाच्या वेबसाईटने आता टाकली आहे कात
कला, साहित्य, विविध लेखांची झाली आहे खैरात

नवा रंग, नवा ढंग, नवे आहे आकर्षक रुप
सभासदांचाही त्यामुळे वाढतो आहे हुरुप

बालादपि सुभाषितम्‌ ग्राह्यम सार्थ करतो हे लेख शर्वरीचा
संक्रमणातून आलेख उंचावेल खचितच राष्ट्राच्या उन्नतीचा

रंगरेषांवरची तन्वीची अजब आहे हुकुमत
मनाला घालते मोहिनी तिची कुंचल्याची करामत

तोंडाला पाणी सुटणार्‍या मुग्धा, भूपेश, वैशालीच्या रेसिपी
नयनसुखासह रसनेचीही नक्कीच करतील तॄप्ती

मनाचा निखळपणा दाखवणारे लेख श्रुती, मुग्धा व दीपिकाचे
भ्रमंतीला प्रोत्साहित करते सचित्र वर्णन अश्विनीचे

स्वाती अन्‌ दीपिकाच्या कवितेतील विषय विविधता
मराठी बाण्याला सुखावते जयश्रीचे गीत अस्मिता

उत्साही कमिटीला लाभले कुमठेकरांसारखे कार्यतत्पर अध्यक्ष
वर्षभर अनोख्या कार्यक्रमांनी नक्कीच वेधून घेतील आपले लक्ष

नव्या कमिटीला खूप खूप शुभेच्छा !!!

 


by Shruti Hajarnis on January 22, 2011

महाराष्ट्र मंडळाच्या इतिहासात कालचा दिवस ही एक अनोखी संध्याकाळ घेऊन आला. निमित्त होते संक्रांतीच्या सणाचे. कार्यक्रम स्थळी सगळीकडे नटलेल्या स्त्रिया, बागडणारी मुले, रंगलेल्या पुरुषांच्या गप्पा, एकीकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम, वाण, आणि भेटीची सुरवात "तिळगुळ घ्या गोड गोड बोला...", या शब्दांनी वातावरण निर्मिती केली होती. गजलनवाज भीमराव पांचाळेच्या मैफिलीच्या पूर्वी सगळीकडे उल्हासित झालेले वातावरण नक्कीच नजरेत भरण्याजोगे होते.

सभागृहात प्रवेश केल्या केल्या मकर संक्रांत कार्यक्रमाची सजावट लक्ष वेधून घेत होती... सगळी कडे पतंग विविध रंगाचे, आकाराचे...  क्या बात है ! सणाच्या  च्या अनुषंगाने केलेली सुंदर आणि लक्षवेधक सुबक मांडणी... मला वाटते एवढेच शब्द पुरेसे आहेत वर्णन करायला... ह्या साठी सौ. खनके आणि सौ. राणे ह्यांचे अभिनंदन.

कार्यक्रमाची सुरवात झाली ती गणेश वंदनेने. नंतर मुद्देसूद अध्यक्षीय भाषण... त्यानंतर  मंडळाने बक्षिसांची उधळण करून केलेली कमाल, जणू काही नवीन कार्यकारी समिती हे वर्ष वेगळे ठरणार ह्यांची नांदी देत होते असे वाटत होते आणि मग ज्या क्षणाची वाट बघत होतो तो आला.  गजलनवाज भीमराव पांचाळे यांची मैफिल सुरु झाली आणि काही वेळेतच त्यांनी मैफिल  काबीज केली.

आता पर्यंत गझल नुसत्याच वाचल्या होत्या. पण जेव्हा  गझल प्रत्यक्षात ऐकली तेव्हा त्याची सुंदरता, त्याचे अर्थ जास्त चांगले कळले. भीमराव ज्या पद्धतीने गझल समजावून गात होते त्यामुळे अधिकच मजा आली. अडीज-तीन तासांची मैफिल मंत्रमुग्ध करणारी होती.

भीमरावाना तबल्याची साथ देणारे डॉ. देवेंद्र यादव यांचा तबला आणि विविध गायकांच्या उत्कृष्ट गझला ह्यांचा दुहेरी संगम होता. मंडळाने केलेला एक वेगळा प्रयोग निश्चितच स्तुत्य आहे.

एक अनोखी मैफिल आम्हां सारख्या श्रोत्यांसमोर सादर केल्याबद्दल महाराष्ट्र मंडळ साल २०११ कार्यकारणी समितीचे आभार. 

 


by Aditi Juvekar on January 22, 2011.

Dear All Committee members,

Hearty congratulations for organising makar sankranti program.It was a well coordinated event and a grand success.My best wishes to Ogranising committee and we look forward to many such events in future. 

 


by दीपिका जोशी "संध्या" on January 17,2011.

महाराष्ट्र मंडळाचा वार्षिक कार्यक्रम... अफलातून.... !

बघता बघता २०१० संपत आले होते. महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिक कार्यक्रमाची प्रतिक्षा सुरूच असते. आपल्याच सगळ्यांमधील कलांना ह्या कार्यक्रमात खूप वाव असतो. बच्चे कंपनी आपल्यापरी तर मोठे आपल्यापरी... कसून प्रयत्न करत असतात. ३-३ महिन्यांचा सराव.. कोणासाठीच इतका सोपा नाही.

१० डिसेंबर ला दुपारी २.३० ला केंब्रिज शाळेत जमणार होतो. कोणी छान छान साड्यांमधे..कोणी पंजाबी ड्रेस मधे... रंगबिरंगी..चमचम... महाराष्ट्र मंडळ व सगळेच सदस्य चमकत होते. थोडा उशीरा कार्यक्रम सुरू झाला. छुटकू मुलांनी मज्जा आणली. ह्या ३-४ वर्षात महाराष्ट्र मंडळात खूप बदल जाणवतो की नाटकाव्यतिरिक्त मोठ्यांचे नाच किंवा तत्सम कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. लग्नानंतर थोडी संवय कमी झाली असेल असे वाटणे आजकाल महिलांची नाच करण्याची कमाल बघून एकदम चुकीचे ठरते. उत्कृष्ट संयोजन व दिग्दर्शन दिसून येते. प्रेरणा वलिवडेकर तर ह्या क्षेत्रात माहीर आहेच पण यंदा मुग्धा सरनाईक चे पण कौतुक करावे तितके कमी आहे. ‘राधा ही बावरी’ ही तिची दिग्दर्शित दर्जेदार नृत्यकला आणि सगळ्यांची सारखी वेषभुषा... सगळ्यांच मैत्रिणींनी छान नृत्य केले.

श्रृति हजरनीस ने नेहमीप्रमाणे मुलांवर किती मेहनत घेतली असेल ह्याचा प्रत्यय आलाच.एकाच वेळी ३-४ कार्यक्रमात भाग घेणे किती अवघड पण ते मुलांना सोपेच असते हेच तिने दिग्दर्शित नाचांमधे करून दाखवले. लहान मुलांना आपल्या तालावर नाचवणे किती कठिण असेल हे तीच जाणे. तिला सलाम... व कौतुक आहे.

फॅशन शो काय... भालू, ससोबांचे छान बालनाट्य काय... लहान लहान मुलींचे नृत्य...लाजवाब होते सगळेच कार्यक्रम...

आपल्या मराठी सणांची ओळख तर वाखाणण्यासारखी होती. प्रत्येक सणाच्या अनुषंगाने नाचांचे आयोजन होते. मधेच गणपति बाप्पांच्या आगमनाचे आणि बाल्या नृत्याची ओळख कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी करून देऊन एकदम मज्जा आणली.

ऐकून होतो की शेवटच्या नंबरवर असलेली लावणी बघण्यासारखी आहे. सौ.मुग्धा सरनाईक दिग्दर्शित व सौ. भारती वासेकर आणि सौ. तृप्ती पराडकर यांनी सादर केलेली लावणी म्हणजे कार्यक्रमाची पर्वणीच होती. कौतुकाला शब्द नाहीत. ‘वाजले की १२’ ही नावाजलेली लावणी इतक्या ताकदीने पेलणे म्हणजे खेळ आणि मजा नाही.. अप्रतिम.. ‘एकदा पुन्हा होऊन जाऊ द्या हो...’ असे सगळेच म्हणु लागले.. वाटले की बाप रे.. आधीच ह्या दोघी इतक्या थकल्या आहेत..(जवळपास ६-७ मिनिटांची ती लावणी आहे) आम्हाला काय लागतंय पुन्हा नाचा म्हणायला.. पण त्या दोघींची कमाल की त्या पुन्हा हजर झाल्या. त्यांची पावले तितक्याच जोमाने थिरकत होती. प्रेक्षक पण उत्साहात आले.. थिरकले... आणि धम्माल आली... इंग्रजीत म्हणायचेच झाले तर मुग्धा आणि भारती व तृप्ती पुढे hats off…..

मध्यांतरात गरम मस्त मसालेदार चहाचा आस्वाद घेऊन नंतर आता नाटकाची प्रतीक्षा संपणार होती. प्रसन्न देवस्थळी चे दिग्दर्शन असलेले नाटक दरवर्षीच अफलातुन असते. यंदा होते ‘चार दिवस प्रेमाचे’. कलाकार मंडळी नेहमीचीच.. नावाजलेली... क्या कहने... सगळ्यांनीच भूमिका भूमिकेप्रमाणे तंतोतंत वठवल्याच पण विशेष कौतुक जयश्री अंबासकर आणि मृदुला रानडे ह्या दोघींचे... थोडा कंटाळा आल्यासारखा झाला होता तो पुन्हा तजेला देऊन गेला.

थोडा उशीर झाला कार्यक्रम संपायला पण आनंददायी होता हे नक्कीच. लहान मुलांचा अंत मात्र बराच बघितला गेला.. बिचारे फारच कंटाळले होते. ‘आई-मम्मी.. चल घरी जाऊ नं..’ हेच कानांवर पडत होते सारखे.

आता मंडळाने प्रतिभाकुंज सुरू करून नवे पाऊल टाकले आहे. मंडळ अभिनंदनास १०० टक्के पात्र आहेच. सुरुवात उत्कृष्ट झालीच आहे. सगळ्यांचा लेखनाचा उत्साह वाढला आहे. जसे रोज रोज नवीन लेखन येणार तसे तसे महाराष्ट्र मंडळाच्या ब्लॉग चे काम बघणार्यां चे रोजचे काम भरपूर वाढणार आहे पण प्रतिभावान मंडळ ही कामगिरी नक्कीच पार पाडेल ह्यात शंका कोणालाच नसेल.

महाराष्ट्र मंडळातील सदस्यांना आपली मते व्यक्त करता येतील. सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रियांचे स्वागतच होईल अशा अपेक्षा आहे. एकमेकांचे मत ह्या द्वारे जाणून घेता येईल. अनुकूल वा प्रतिकूल (प्रत्येक सदस्यास हे स्वातंत्र्य नक्कीच असावे की प्रतिक्रिया कशा प्रकारची द्यावी) प्रतिक्रियेमधुन मंडळाला पण कुठे काही नवीन करता येतंय का किंवा कुठे काही चुकतंय का... सुधारणा कुठे हवी आहे ह्याचा विचार करता येईल. कार्यक्रम वेळेवर सुरू व्हावा ह्याकडे पण मंडळाला सगळ्यांच्या सहकार्याने लक्ष नक्कीच देता येईल कारण मंडळ आपलेच आहे. सगळ्यांनीच बरोबरीने चालून प्रगतिपथावर पुढे जायचे आहे.

बाकी वार्षिक सम्मेलनाचा हा सोहळा उत्कृष्ट पार पाडल्याबद्दल सगळ्याच कार्यकारी सभासदांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!!

ह्या नव-स्थापित मंडळाला भरपूर शुभेच्छा. व नव-नवीन मनोरंजन व सम्मेलन-भेटीगाठींच्या अपेक्षेत.... 

 


by दीपिका जोशी "संध्या" on January 14,2011

महाराष्ट्रमंडळाने मराठी नाटकाच्या 'प्रभाकराचा' अस्त झाल्याचे आपल्या साईटवर नमूद करून व त्यांना श्रद्धांजली दिली. धन्यवाद.

अशी जागरूकता कौतुकास्पद आहे. 

 


By Mrs. Swati Kulkarni on January 11,2011

प्रतिभा कुंज च्या ह्या फुलोर्‍याची पालवी उत्तमोत्तम फुलत रहावी, आणि बहरावी. नव्या प्रतिभांना दिलेला हा मंच निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. मनःपूर्वक अभिनंदन.

 


by Mrs. Mugdha Sarnaik on January 10,2011

Today I just surfed MMKW website and got a pleasent surpise of of all Annual Day photos loaded on it as well as start up of Pratibha Kunj section. Really gr8 and thanks for giving the members so much of publicity and opportunity.

MMKW Rocks!!!

 


by दीपिका जोशी 'संध्या’ on January 10,2011

महाराष्ट्र मंडळाच्या नव्या प्रतिभाशाली समितीने हे प्रतिभाकुंज बनवलेय.... नवे पाऊल... खूप खूप अभिनंदन आणि  प्रतिभावान लोकांना एक लेखनाची स्फूर्ती मिळाली हे पण नक्की.

अतिशय सुंदर सजावट ह्या साहित्य फुलोर्‍याची आहे सगळ्यांच्या मेहनतीने हा फुलोरा सतत फुलत राहिलंच

उत्तरोत्तर प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा !!

 


Newsletter

Contact us

You are here: Home Feedbacks Old Feedbacks