Maharashtra Day 12 May 2017

Car Museum Visit- 23 September 2017

गणेशोत्सव- २०१७

कोजागिरी पौर्णिमा एवं दांडिया- ६ ऑक्टोबर २०१७

दिवाळी सोहळा- शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७

MMK Picnic 2017

Marathi Bhasha Divas 2017

Bhasha Din 2017

क्रिकेट प्रीमियर लीग 2017

Blog

  • Home
    Home This is where you can find all the blog posts throughout the site.

ध्यास सौ. स्मिता काळे

Posted by on in Blogs 2016
  • Font size: Larger Smaller
  • Hits: 938
  • 0 Comments
  • Subscribe to this entry
  • Print

"तो दिवस कलाटणी देणारा होता". नेहमी प्रमाणे रोजची कामे आवरून whats app messages पाहत होते. आमच्या मैत्रीणींच्या ग्रुप मध्ये एका मैत्रिणीचा message होता -- भारतीय महिलांनी मिळून जगातील सर्वात मोठ्ठे crochet blanket बनवायचे ठरवले आहे. ईच्छा असेल तर नाव नोंदवा. त्या क्षणी crochet म्हणजे काय हे "Google" करून पाहिले आणि हे आपले काम नाही म्हणून सोडून दिले. लगेचच अजून एका मैत्रिणीचा message आला. "yes, नाव नोंदवते " आणि मला वाटले आपणसुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही, पाहू तर करून. काही तरी नवीन शिकायला तर मिळेल. मी पण उत्तर दिले… मी पण नाव नोंदवते … झालं , त्या दिवसापासून डोक्यात अखंड crochet crochet crochet घोळत राहिले …. काही दिवसात MICQ ( Mother India Crochet Queen ) ची जननी, चेन्नईची Subashri Natarajan ने Facebook page बनवले. त्यात कोणत्या प्रकारची लोकर वापरायची, कोणत्या नंबरची सुई वापरायची, कोणते डिझाईन बनवायचे, त्याची मापे अशी सर्व बारीक बारीक माहिती दिली. जस-जश्या महिला जमत होत्या तस तसे त्यांच्या शंका, प्रश्न, अडचणी, तयार होत असलेले blanket इत्यादी posts Facebook वर येत होत्या. त्यातून खूप माहीती मिळत होती. कुवेतची MICQ Coordinator, भवानी, पण अत्यंत हुशार, नम्र, हसरी crochet queen आहे. तिला तर शंका विचारून बेजार केले होते. आम्ही आमचे सर्व साहित्य गोळा केले आणि एक दिवस Granny square Crochet blanket चा "श्री गणेशा" केला. मैत्रिणीचे सहकार्य, शिकवण्याची तयारी आणि patience ह्याला माझा सलाम. माझ्या सारख्या कधीही Crochet न केलेल्या, खरं तर crochet म्हणजे काय हेच माहीत नसलेल्याला शिकवणे म्हणजे कठीण काम. अतिशय मनापासून संयमाने blanket करायला सुरुवात केली. जसे blanket पूर्ण झाले तसा ग्रुपचा आकडा पण वाढत गेला. सुरुवातीला ६ महिलांनी सुरुवात केलेला कुवेत ग्रुप ९६ महिलांचा ग्रुप झाला. त्यानंतर सगळी blankets जोडुन मोठ्ठे 11,148.5 m² (120,001 ft² 72 in²) Crochet blanket बनवून ३१ जानेवारी, २०१६ रोजी Guinness World Record प्रस्थापित केले. हि सर्व blankets NGO 's ना दान केली. Officially Amazing असे Certificate मिळाले. त्यानंतर मी crochet च्या प्रेमात पडले आणि स्कार्फ, कॅप, पोंचो, hand gloves , स्वेटर असे अनेक प्रकार केले आणि अजुनही करतच रहाते. ह्या सर्व कार्यात समाज सेवा, नवीन कला, खूप खूप नवीन मैत्रिणी, perfect professionalism असे अनेक आनंददायी अनुभव आले. काही तरी वेगळं केल्याचा आनंद तर होताच पण त्याच बरोबर आपण जे आत्तापर्यंतच्या आयुष्यात कधीच केले नाही किवा ज्याचा साधा विचार सुद्धा केला नव्हता, ते नक्की करू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला . म्हणूनच सुरुवातीला म्ह्टले कि "तो दिवस कलाटणी देणारा होता"

 

 

Comments

  • No comments made yet. Be the first to submit a comment

Leave your comment

Guest
Guest Monday, 20 November 2017

Newsletter

Contact us

You are here: Home Blog Sandeep Lele ध्यास सौ. स्मिता काळे