दिवाळी सोहळा

कार म्युझियम

कोजागिरी पौर्णिमा दांडिया

गणेशोत्सव- २०१७

Blog

 • Home
  Home This is where you can find all the blog posts throughout the site.

माझे गाव

Posted by on in blogs 2012
 • Font size: Larger Smaller
 • Hits: 8026
 • 1 Comment
 • Subscribe to this entry
 • Print

अमेरिकेतल्या आर्थिक मंदीच्या सुरुवातीचा काळ. तिथे स्थायिक असलेल्या माझ्या मित्राशी मी बोलत होतो. संजीव आणि मी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात एकत्र होतो. पदवी प्राप्त केल्यानंतर जवळ जवळ सतरा वर्षांनी संजीवचा संपर्क झाला होता. मध्यंतरीच्या काळात त्याने अमेरिकेत येऊन M.S. केले आणि नोकरीत अगदी उच्च पदापर्यंत पोहोचला होता आणि आता मंदीचा त्यालाही फटका बसला होता. संजीव सांगत होता तो आता भारतात जायचा विचार करतोय. मला थोडे आश्चर्य वाटले आणि अवघड ही. अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलांना भारतात कसे जुळवून घेता येईल वगैरे.
तेव्हा माझ्या मनात सहज   आलेला प्रश्न मी त्याला विचारला होता “संजीव, भारतात तुझे गाव कुठे?”. त्याचे तेव्हाचे उत्तर मला खोलवर लागले होते. “दिलीप, वडील शासकीय नोकरीत असल्याने दर दोन तीन वर्षांनी बदल्या होत गेल्या, नवीन ठिकाण-नवीन शासकीय निवास स्थान- नवीन शाळा, अशी आमची गावे बदलत गेली. आता मला जाणवतेय की सांगावे असे मला माझे गावच नाही.”
मी ही कल्पनाच करू शकत नव्हतो. गाव कसे मनात आणि उरात कोरलेले असते.

b2ap3_thumbnail_Hometown.png

माझे बालपण कोंकणातल्या गावात गेलेले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले माझे गाव. घराच्या पुढच्या दारात उंबरठ्यावर  सकाळी बसल्यावर समोर दिसणार्या सह्याद्रीच्या उंच कड्याने आयुष्यात नेहमीच कणखर बनण्यासाठी प्रेरणा दिली. शेतातून पायपीट करत शाळा गाठताना शेतातल्या बांधांनी तेव्हाच आयुष्यात पुढे येणाऱ्या चढ उतारांची तयारी करून घेतली.
गावातली झाडे तर अशी लक्षात राहिलीत-“झाडे सावली देतात .. झाडांचे संदर्भ प्रवासात दिशा देतात .. तळ्याकाठची झाडे अंतर्मुख करतात .. माळरानावरची झाडे उन्हात करपतात; क्षितीज उलगडतात.. ...डोंगरातली झाडे खंबीर असतात .. झाडे सावली देतात; झाडे जीव लावतात..” वय वाढून मोठे झाल्यावर आणि गावापासून दूर राहायला लागल्यावर माणसांच्या गर्दीत माणूस शोधताना या झाडांनीच घालून दिलेले मापदंड उपयोगात आले.

b2ap3_thumbnail_homefarm.png

भावंडांबरोबर नदीत डुंबत घालवलेल्या सुट्ट्या, पावसाळ्यातल्या एखाद्या अतिवृष्टीच्या दिवशी नदीच्या किनार्यावर उभे राहून त्याच नदीचे रोद्ररूप बेभान होऊन बघत घालविलेले तासन तास आजही किनार्याचे भान ठेवायची शिकवण देतात. कधी कधी शाळेतून यायला उशीर होणार असला की आजोबा शाळेपाशी सोबतीला थांबायचे... म्हणे वाटेवरच्या त्या झाडावर भूतांचे वास्तव्य असायचे, पण विशेष असे की  आजोबांनी नेहमी असेच सांगितले होते “त्या झाडावरचे भूत जागे असते आपल्याला सोबत देण्यासाठी”.
तर असे हे गाव ..आठवणीतले  माझे गाव.
सहा महिन्यांपूर्वी भारतात गेलो होतो तेव्हा संजीवला भेटायला गेलो.
संजीव गेली दहा वर्षे औरंगाबादला असतो. संजीवच्या घरी एक दिवस मुक्कामाला होतो. त्याची मुलगी कत्थक नृत्य शिकलीय. मुलगा तबला वाजवतो. ज्या गावात संजीवचा भाऊ आणि त्याचे कुटुंब स्थाईक आहेत. आणि संजीव सांगत होता त्याच्या मुलांना आजी आणि आजोबांसोबत सुद्धा वेळ घालवायला मिळाला. त्याच्या चेहर्यावर समाधान दिसत होते. त्याने त्याच्या मुलांना ‘त्यांचे गाव’ दिले होते.
प्रत्येकाला असते एक गाव .. त्याचे गाव .. माझे गाव .. जिथे नाही फक्त आपली माणसे असतात तर तिथला निसर्ग सुद्धा तेव्हढाच आपला असतो.

Comments

 • Guest
  Riya gurav Saturday, 20 August 2016

  ठीक आहे???

Leave your comment

Guest
Guest Saturday, 20 January 2018

Newsletter

Contact us

You are here: Home Blog himangi माझे गाव